Google Ad
Uncategorized

आषाढीवारी  पालखी सोहळा सन २०२३ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वारक-यांकरिता पुरविण्यात येणा-या  विविध सेवासुविधांचे आणि इतर नियोजन कर दोन्ही संस्थानांच्या विश्वस्तांबरोबर झाली आढावा बैठक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ मे) : आषाढीवारी २०२३ च्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीने स्थापत्य, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्थेबरोबरच यंदाची वारी पर्यावरणपूरक,प्लास्टिक मुक्त, हरितवारी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने संबंधित विभागांना तातडीने कामकाम करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिल्या.      

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज  आणि जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या जून महिन्याच्या आषाढीवारी  पालखी सोहळा सन २०२३ च्या अनुषंगाने महापालिकेच्या  वतीने  वारक-यांकरिता  पुरविण्यात येणा-या  विविध सेवासुविधांचे आणि इतर नियोजन करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अतिरिक्त प्रदीप जांभळे पाटील आणि उल्हास जगताप यांच्या विशेष उपस्थितीत दोन्ही संस्थानांच्या विश्वस्तांबरोबर आढावा बैठकीचे आयोजन मनपा मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकरराव पवळे सभागृह येथे करण्यात आले होते, त्यावेळी महानगरपालिकेने तयार केलेल्या कृती आराखड्याचे सादरीकरणानंतर मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त वाघ बोलत होते.

Google Ad

          महापलिकेच्या वतीने आषाढीवारी  पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वारक-यांकरिता  विविध सेवासुविधा दरवर्षी पुरविण्यात येतात. ह्या वर्षीच्या आषाढीवारी  पालखी सोहळा नियोजनाच्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, उप आयुक्त रविकिरण घोडके, , सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले, अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त प्रशांत लायगुडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन पवन नव्हाडे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थाचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे पाटील, उत्तम माने, जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थांचे विश्वस्त माणिक मोरे, पालखी सोहळा प्रमुख, अनिल मोरे, भानुदास मोरे,संजय मोरे,  विठ्ठल मंदिर आकुर्डीचे विश्वस्त माजी नगरसेवक  गुलाब कुटे, प्रमोद कुटे,बाळासाहेब कुटे, सह शहर अभियंता ज्ञानदेव झुंजारे, संजय खाबडे, संजय कुलकर्णी,बाबासाहेब गलबले, क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे,राजेश आगळे,विजयकुमार थोरात-

अमित पंडित, शितल वाकडे, उमेश ढाकणे, सिताराम बहुरे, आरोग्य विभाग प्रमुख विनोद जळक, कार्यकारी अभियंता संजय घुबे, विलास दिसले, शशिकांत मोरे,महेश कावळे,अनिल भालसाकळे, थॉमस नरोन्हा , प्रेरणा शिनकर, के.व्ही.दिवेकर,बापू गायकवाड,वासुदेव मंदावे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्वला गोडसे, आर्ट ऑफ संस्थेचे तुषार अल्हाट, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे जयप्रकाश सगडे, उमेश कवडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पोलीस अधिकारी रंगनाथ उंडे, विजया कारंडे,सतीश नादुंरकर, अर्जुन पवार, डॉ.ए.के.वाघमोडे, दि.रा.साळुंखे, विश्वजित खुळे, निलेश नलावडे, अजय भोसले,निलेश नलावडे, राजू रणदिवे, एन.डी.थोरात, शंकर डामसे, राम राजमणी, भास्कर जाधव,सुनील गोडसे, राजेंद्र बोरसे, जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे, अभिजीत डोळस, विनोद सकट  आदी उपस्थित होते.बैठकीत  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरू संत तुकाराम महाराज संस्थान कमिटीच्या वतीने विश्वस्तांनी विविध सूचना केल्या त्यामध्ये  महानगरपालिकेच्या वतीने महापालिका कर्मचारी आणि वारकरी प्रतिनिधी असा संयुक्त स्वागत कक्ष उभारला जावा जेणेकरून वारकरी दिंडी प्रमुखांना संपर्क साधणे सोईस्कर होईल ,पिण्याच्या पाण्याची मुबलक सोय करावी, रस्त्यातील अतिक्रमणे दूर करावीत, पोलीस बंदोबस्तात वाढ व्हावी, पालखी मार्गावर देशी वृक्षांची लागवड करावी,  सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, कार्डियाक ॲम्बुलन्सची सोय करावी.

स्वागत कमानीवरील रंगरंगोटी व दिव्यांची दुरूस्ती करावी, वारकऱ्यांचे भिंतीचित्र खराब झाले आहे, त्यात सुधारणा करावी, स्नान पाण्याचे नियोजन करणे, पालखी पहाटे मार्गस्थ होत असल्याने रस्त्यावरील लाईट साडेसात पर्यंत चालू ठेवावे, पुरेशा टँकर पुरवठा आदी सूचना केल्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सूचनांबाबतीत पालखी मार्गाचे पाहणी करून योग्य नियोजन करण्यात येईल तसेच लवकरच याबाबत आयुक्त तथा प्रशासक यांच्या अध्यक्षतेखाली पुढील आढावा बैठक घेण्यात येईल  असे सांगितले.

          पोलीस उप आयुक्त विवेक पाटील यांनी विविध पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांकडून  बैठकीत  माहिती घेऊन आढावा घेतला आणि पालखी दरम्यान योग्य बंदोबस्त आणि उपाययोजना करण्यात येतील असे सांगितले.

          उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दोन्ही पालखीच्या प्रस्थानांच्या अनुषंगाने वाहतूकीत बदल करण्याबाबत सूचना देण्यात येतील जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही त्यास महापालिकेने प्रसिद्धी द्यावी असे सांगितले.

          महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तसेच अन्न व औषध प्रशासन प्रतिनिधींनी पालखी दरम्यान योग्य ती दक्षता व व्यवस्था  करण्यात येईल असे बैठकीत सांगितले.

          आढावा बैठकीचे  प्रास्ताविक व सुत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी मानले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!