Google Ad
Editor Choice

नवी सांगवी मधील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर भव्य पेन्शन मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (ता. १९ जानेवारी) :

गरीब लोकांच्या वृद्धापकाळातील उत्पन्ना च्या बाबतीतील चिंता वाटते. असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगारांच्या दीर्घायुषी आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून या असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगारांना त्यांच्या निवृतीनंतर च्या आयुष्यासाठी पेन्शन योजना आणण्यात आली. परंतु गेल्या सहा वर्षांपासून हेच पेन्शनधारक नागरिक आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत आहेत. त्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती, पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्यावतीने २३ तारखेला सोमवारी दुपारी ३ वाजता नवी सांगवी मधील न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर भव्य मेळावा होणार आहे.

Google Ad

७० लाख पैकी २३ लाख पेन्शनधारक यांना एक हजारपेक्षा कमी पेन्शन मिळत आहे. यामध्ये महागाई विचारात घेता जीवन जगणे पेन्शनधारकांना अवघड झाले आहे. ते. याचा विचार केंद्र सरकारने तातडीने करावा. कमीतकमी पेन्शन रुपये ७५०, महागाई भत्ता व मोफत मेडिकल सुविधा, आदी मागण्या पूर्ण करून पेन्शन धारकांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सदर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोकराव राऊत, राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय मुख्य सल्लागार डॉ. पी. एन. पाटील, क्षेत्रीय संघटक प. भारत सुभाष पोखरकर, मुख्य समन्वयक सी. एम. देशपांडे व विलास पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील पेन्शनधारक नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत व उपाध्यक्ष तानाजी काळभोर यांच्यासह पुणे जिल्हा अध्यक्ष सतीश शिंदे, कार्याध्यक्ष सी.एम. राऊत, समन्वयक अजित घाडगे व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!