Google Ad
Editor Choice

राजकारणापलीकडची सामाजिक बांधिलकी जपत आमदार शंकर जगताप यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात!

राजकारणापलीकडची सामाजिक बांधिलकी जपत आमदार शंकर जगताप यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात!

३० टन जीवनावश्यक साहित्याच्या माध्यमातून एक हजार शेतकरी कुटुंबांना आधार

Google Ad

महिनाभराचे रेशन किट आणि दिवाळी फराळाचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : लोकप्रतिनिधित्व म्हणजे केवळ राजकीय जबाबदारी किंवा विकासकामांपुरते मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची सामाजिक बांधिलकी असते. याच जाणिवेतून आणि सेवाभावाच्या संस्कारांतून चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी मदतीचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. बार्शी, भूम-परांडा, कळंब आणि गेवराई परिसरातील एक हजार गरजू शेतकरी कुटुंबांना महिनाभर पुरेल असे जीवनावश्यक साहित्याचे रेशन किट आणि दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्या घरात सणाचा आनंद पोहोचवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ३० टन जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.

दुष्काळाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक आणि कौटुंबिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत या कुटुंबांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी आमदार जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या शहरी भागाचे प्रतिनिधित्व करत असतानाही ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी त्यांनी उचललेले हे पाऊल सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण ठरत आहे.

या मदत उपक्रमांतर्गत बार्शी परिसरातील शेलगाव आणि खडकलगाव येथील प्रत्येकी १५० अशा एकूण ३०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देण्यात येणार आहे. भूम-परांडा परिसरातील कासारी येथील १५० आणि सिरसाव येथील पारधी वस्तीतील १०० अशा २५० कुटुंबांना मदतीचा लाभ मिळणार आहे. कळंब परिसरातील गोलेगाव येथील १५० आणि दाभा येथील १०० अशा २५० कुटुंबांना रेशन किटचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच गेवराई तालुक्यातील लोणाळा येथील २०० कुटुंबांनाही या उपक्रमाच्या माध्यमातून मदत पोहोचविण्यात येणार आहे. अशा प्रकारे एकूण सात ठिकाणांवरील एक हजार शेतकरी कुटुंबांना या उपक्रमाचा आधार मिळणार आहे.

राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. शासनाच्या या प्रयत्नांना सामाजिक स्तरावर हातभार लावण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संकटकाळात केवळ शासनावर अवलंबून न राहता समाजातील सक्षम घटकांनीही पुढाकार घेऊन गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, ही व्यापक भूमिका यामागे आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांतून मिळालेला निःस्वार्थ सेवाभाव, राष्ट्र प्रथम आणि समाज प्रथम ही भूमिका तसेच कुटुंबातून मिळालेले सामाजिक बांधिलकीचे संस्कार आमदार जगताप यांच्या सार्वजनिक जीवनाचा महत्त्वाचा आधार राहिले आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देणे, हीच खरी समाजसेवा असल्याच्या भावनेतून त्यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे.

विशेष म्हणजे, शहर आणि ग्रामीण भाग यांच्यातील नाते केवळ भौगोलिक किंवा आर्थिक नसून परस्परांच्या सुखदुःखाशी जोडलेले आहे, हा संदेशही या उपक्रमातून देण्यात येत आहे. शहरी भागातील लोकप्रतिनिधीने ग्रामीण भागातील संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी पुढाकार घेणे, हे सामाजिक एकात्मतेचे सकारात्मक उदाहरण आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांचा सन्मान करत त्यांच्या कठीण काळात मदतीचा हात देणे, ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याची जाणीव या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.

लोकप्रतिनिधीच्या कार्याची खरी ओळख केवळ विकासकामांच्या आकडेवारीतून होत नाही, तर संकटकाळात तो किती संवेदनशीलतेने समाजाच्या पाठीशी उभा राहतो, यातूनही होते. प्रसिद्धीपेक्षा सेवाभाव, अधिकारापेक्षा कर्तव्य आणि राजकारणापेक्षा माणुसकीला प्राधान्य देणारा आमदार शंकर जगताप यांचा हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाचा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे.

शेतकऱ्यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे कर्तव्य आहे आपल्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कष्टावर संपूर्ण समाज उभा आहे. मात्र, निसर्गाच्या संकटामुळे त्यांच्याच कुटुंबांवर अडचणींचा डोंगर कोसळतो, तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आपले नैतिक आणि सामाजिक कर्तव्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारांतून आम्हाला समाजसेवेची प्रेरणा मिळाली आहे. समाजाने आपल्याला जे दिले, त्याची परतफेड समाजाच्या सेवेतूनच झाली पाहिजे, ही आमची भावना आहे. या मदतीमुळे एक हजार शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले, त्यांच्या घरातील चिंता थोडी जरी कमी झाली, तरी या प्रयत्नांचे सार्थक होईल. राजकारण, मतदारसंघ आणि भौगोलिक सीमा यांच्यापलीकडे जाऊन माणुसकीचे नाते जपणे, हीच आमची सामाजिक बांधिलकी आहे.

– आमदार शंकर जगताप, चिंचवड विधानसभा मतदारसंघ

 

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!