Google Ad
Editor Choice Education

पिंपळे गुरव येथील ‘ब्रिलियंट स्टार प्री स्कूल’ मध्ये एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम उत्साहात साजरा!

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल मध्ये जवानांसोबत रक्षाबंधन हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी भारतीय लष्करातील जवान उपस्थित होते, सुरुवातीला त्यांच्या आगमनानंतर त्यांना औक्षण करण्यात आले त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी परेड करून त्यांना मानवंदना दिली आणि त्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले .

आपल्या शाळेत जवान आल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता . शाळेतील मुलींनी त्यांना राख्या बांधल्या त्याचबरोबर शिक्षक भगिनी यांनीही त्यांचे औक्षण करून राख्या बांधल्या यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना स्नेहा वाघ मॅडम म्हणाल्या की जवान हे आपल्या देशाचे रक्षण करत असतात त्यामुळेच देशांमध्ये आपण सुरक्षित आहोत कर्तव्यावर असताना त्यांना आपल्या कुटुंबापासून भगिनीपासून दूर राहावे लागते बऱ्याच गोष्टीचा त्यांना त्याग करावा लागतो अशावेळी त्यांच्यासोबत देशवासीय आहेत आपल्या भगिनी आहेत हे आपल्याला दाखवून देण्याचा हा एक प्रयत्न आहे . जवानांचा त्याग बलिदान देशवासीयांसाठी खूप मोलाचे आहेत त्यासाठीच एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा उपक्रम राबविला आहे .जवानांच्या या कार्याबद्दल देशवासीय सदैव त्यांचे ऋणी राहील .

Google Ad

अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे आपल्याला काम करण्याची ऊर्जा मिळते आपण आपल्या कुटुंबीयांसोबत आहोत असे वाटते अशा प्रकारची भावना उपस्थित जवानाकडून व्यक्त केल्या .यावेळी शाळेच्या वतीने सीमेवरील जवानांसाठी 1000 राख्या कार्यक्रमासाठी आलेल्या या जवानांकडे सुपूर्द करण्यात आल्या व शाळेच्या वतीने त्यांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड विधानसभेचे कार्यक्षम आमदार आदरणीय शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे संस्थापक नवनाथ देवकर यांनी केले तर शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना देवकर यांनी सर्वांचे आभार मानले .

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!