Google Ad
Uncategorized

पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ‘अनिल वडघुले’ यांचा संवाद व्यासपीठच्यावतिने सत्कार–!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑक्टोबर:) -पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदि अनिल वडघुले यांची फेरनियुक्ति करण्यात आली. त्याबद्दल त्यांचा संवाद व्यासपीठ च्या वतिने स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, निवृत्त पोलिस अधिकारी सुर्यकांत लोहार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनिल वडघुले हे साप्ताहिक झुंज चे संपादक असुन नाट्य व सिने अभिनेते आहेत.

त्यांनी यापूर्वीही पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी काम केले आहे.त्या कार्याची पावती म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा.एस.एम देशमुख सर, विश्वस्त किरण नाईक सर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शरद पाबळे यांच्या आदेशावरून जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर यांनी अनिल वडघुले यांची फेरनियुक्ति जाहिर केली.त्या निमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

Google Ad

या कार्यक्रम प्रसंगी संवाद व्यासपीठचे संचालक श्री हरी मोरे,पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे पञकार हल्ला विरोधी कृती समितीचे समन्वयक सुरज साळवे , गणेश नगर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णुपंत तांदळे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कामगार नेते ह.भ.प.अनिल राऊत, श्री रविंद्र पंडित,भाजप नेत्या निशिगंधा वाल्हेकर,सौ कविता दळवी व राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला नेत्या सौ सुप्रिया दळवी यांच्यासह संवाद व्यासपीठचे विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी अनिल वडघुले यांनी पञकार संघाच्या माध्यमातून पञकारांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशिगंधा वाल्हेकर यांनी तर आभार विष्णुपंत तांदळे यांनी व्यक्त केले.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!