Google Ad
Uncategorized

Odisha : ओडिसामध्ये भीषण रेल्वे अपघात; कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक, 50 प्रवाशांचा मृत्यू, 132 जखमी … मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जून) : ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली.

Google Ad

त्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशासनाने अपघाताबाबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार 132 प्रवासी जखमी झाले असून 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात झालेली धडक इतकी भीषण होती की, कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून उतरली. या अपघातात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर, एक्स्प्रेसचे डब्बे पलटल्याने काही प्रवासी अडकले असल्याचे म्हटले जात आहे. सध्या या मार्गावरून जाणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

विशेष मदत आयुक्त कार्यालयाने माहिती दिली की, अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकार्यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले असून राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे. याशिवाय रेल्वे रुळावरून डब्बे हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी, एका रुळावर दोन गाड्या कशा आल्या याचा तपासही रेल्वेने सुरू केला आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे दोन्ही गाड्या एकाचवेळी एका रुळावर आल्याचे म्हटले जात आहे.

मात्र, अद्याप या अपघाताबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नई ते पश्चिम बंगालमधील हावडा मार्गे ओडिशा पर्यंत धावते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!