Google Ad
Uncategorized

नवी सांगवीकरांच्या सेवेकरिता आता कृष्णा चौकात ‘श्री महाराणी सिल्क साडीज’ वस्त्र दालन सज्ज …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३०एप्रिल)  : कृष्णा चौक, नवी सांगवी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘श्री महाराणी सिल्क साडीज’ या भव्य शोरूम दालनाचा शुभारंभ सोहळा गुरुवारी (दि. २७) उत्साहात संपन्न झाला.

चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या उपस्थितीत तसेच भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते फीत कापून या दालनाचे उद्घाटन करण्यात आले . याप्रसंगी फेवरेट फॅशन वस्त्र दालनाचे संचालक आनंद बोरकर, वैशाली बोरकर, अमर बोरकर, अक्षय शेंडगे, अभिषेक शेंडगे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

यावेळी आयोजित आर. जे. अक्षय प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये वैशाली शेंडगे या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. स्पर्धेतील सहभागी व अन्य विजेत्या महिलांचा पैठणी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शंकर जगताप म्हणाले की, फेवरेट फॅशन या वस्त्र दालनाच्या यशस्वी वाटचालीनंतर बोरकर परिवाराने आता ‘श्री महाराणी सिल्क साडी’ या नवीन दालनाचा शुभारंभ केला. या वस्त्र दालनाच्या माध्यमातून ग्राहकांना चांगली सेवा मिळेल. चिंचवड विधानसभा भाजपा आमदार अश्विनी जगताप यांनीही या दालनास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

येथील वस्त्र दालनात अत्यंत वाजवी दरात ग्राहकांसाठी फॅन्सी डिझायनर साडीज, शालू, पैठणी, कांजीवरम, हँडलुम्स, घागरा-चोली, टॉप, कुर्तीज, लेडीज गारमेंटसह विविध व्हरायटी व डिझाईनच्या अन्य साड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी महिला ग्राहकांना माफक दरात चांगल्या दर्जाच्या साड्या मिळतील असा विश्वास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केला. अक्षय घोळवे यांनी सूत्रसंचालन केले. आनंद बोरकर यांनी आभार मानले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!