Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवड शहरातील H3N2 चा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आमदार अश्विनी जगताप यांची प्रतिबंधक उपाययोजना बाबत आयुक्तांबरोबर तातडीची बैठक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ मार्च) : राज्यात H3N2 च्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये एका ७३ वर्षीय वृद्धाचा यात पाहिला बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे चिंचवड च्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप या मुंबईहून तातडीने पिंपरी-चिंचवडकडे रवाना झाल्या आहेत.

वास्तविक, मुंबईत राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्त आमदार अश्विनी जगताप या मुंबईत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसदर्भात पाठपुरावा करून ते सोडवून घेण्यासाठी त्या अधिवेशनात होत्या. परंतु आपल्या नागरिकांवर आलेले संकट महत्वाचे आहे, उपाययोजना करणे आपले कर्तव्य आहे त्यामुळे त्या अधिवेशन सोडून पिंपरी चिंचवड मध्ये दाखल झाल्या आहेत.

Google Ad

आमदार अश्विनी जगताप यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याची बैठक नियोजित केली असून, संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. महापालिका आरोग्य, वैद्यकीय विभाग आणि रुग्णालय प्रमुखांसह संबंधित अधिकारी आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये शहरातील H3N2 चा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!