Google Ad
Editor Choice

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात राजकीय घडामोडींना वेग … हे, आहेत इच्छुक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०२ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकिकरिता आज एका उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. तर १७ व्यक्तींनी ३२ नामनिर्देशन पत्र नेले आहेत. आज अखेरपर्यंत एकूण ३ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्रे दाखल केलेली आहेत. तर ६२ व्यक्तींनी १०८ नामनिर्देशन पत्रे नेली आहेत. उद्या कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची बैठक घेण्यात येणार आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून अश्विनी लक्ष्मण जगताप, दिवंगत आमदारांचे बंधू शंकर जगताप, माजी गटनेते राहुल कलाटे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे या चार  इच्छुकांनी आज गुरुवारी (दि. २) रोजी थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातुन उमेदवारी अर्ज नेले आहेत, तर बुधवारी राष्ट्रवादीचे राजेंद्र जगताप, माया बारणे यांनीही उमेदवारी अर्ज नेला आहे.

Google Ad

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. भाजपाकडून आणखी कोणी उमेदवारी अर्ज घेणार का हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

▶️आज नामनिर्देशन पत्र नेणाऱ्यांची नावे :-

डॉ.बाळासाहेब उर्फ सोमनाथ अर्जुन पोळ, विनायक सोपान ओव्हाळ, सुभाष गोपाळराव बोधे, हरीश भिकोबा मोरे, विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे, सोयल शहा युनूस शहा शेख, रेखा राजेश दर्शले, संजय भिकाजी मागाडे, किशोर आत्माराम काशीकर, अक्षय विनोद जाधव, हिरामण बाबु बाबर, अश्विनी लक्ष्मण जगताप, जितेंद्र रामचंद्र वाडघरे, विजय सुभाष कलाटे, प्रकाश रामचंद्र बालवडकर, उमेश महादेव म्हेत्रे, कैलाश दशरथ परदेशी

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!