महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे २०२३) : सध्याच्या डिजिटल युगात फसवणूकीसारख्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताय. विविध प्रकारे फसवणूकीचे प्रकार समोर येत असतात. यादरम्यान, पुणे पोलिसांनी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही टोळी दहावी नापास मुलांना चक्क पास असल्याचे प्रमाणपत्र वाटप करत होती. टीईटीनंतर (TET) राज्यातील हा सर्वात मोठा घोटाळा समजला जातोय. या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकण्यात आले आहे.
▶️नेमका प्रकार काय?
दहावी नापास असलेल्यांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी दहावी नापास मुलांना चक्क पास असल्याचे प्रमाणपत्र वाटप करत होती. यासाठी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल सारखी बनावट वेबसाईट देखील तयार करण्यात आली होती.
या रॅकेटचा मुख्य आरोपी छत्रपती संभाजीनगरचा असून कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन, छत्रपती संभाजी नगर) असं त्याचे नाव आहे त्याच्यासोबत अल्ताफ शेख रा. परांडा जी.धाराशिव) आणि सय्यद इमरान सय्यद इब्राहिम (रा. छत्रपती संभाजीनगर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
यातील मुख्य समजल्या जाणाऱ्या कृष्णा गिरी याने काही दिवसांपूर्वी त्याने महाराष्ट्र पब्लिक स्कूल नावाने एक संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना तो पास झाल्याचे प्रमाणपत्र देत होता. यासाठी त्याने एक कार्यालय देखील सुरू केलं होतं. मुलांच्या ऍडमिशनसाठी तो सोशल मीडियावरून प्रचार देखील करायचा. मात्र आता याच कृष्णा गिरीला पुणे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, (पिंपरी) दि. २४ एप्रिल २०२५ : मुख्यमंत्री १०० दिवस उपक्रमाची पिंपरी चिंचवड…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ एप्रिल) : रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सौ.सारिका कृष्णा भंडलकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ०९ एप्रिल : पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत मिळावी, कोणतीही…
पिंपरी चिंचवड शहराचा दळणवळणाचा विकास आरखडा ठरवताना लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून निर्णय घेणार... : पुणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३१ मार्च २०२५ - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी किवळे रस्त्यावर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२५ मार्च : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत…