Google Ad
Uncategorized

पिंपरी चिंचवडमधील आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत … जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ८ डिसेंबर २०२३) : तळवडे येथील एका कंपनीला दुपारच्या सुमारास लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची तसेच १० व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात तातडीने पाठवण्यात आले आहे. मृतांप्रती आयुक्त शेखर सिंह यांनी शोक व्यक्त केला असून कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे.

*पिंपरी चिंचवडमधील आगीतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची आर्थिक मदत

Google Ad

*मुख्यमंत्र्यांकडून दुर्घटनेबाबत शोक व्यक्त

पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथील स्पार्कल कँडल बनवणाऱ्या कारखान्याच्या आग दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. दुर्घटनेतील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींचे शव यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस यंत्रणा करीत आहेत.

जखमी झालेल्यापैकी ८ व्यक्तींना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तात्काळ ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे. तर २ व्यक्तींना थेट पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, आयुक्त शेखर सिंह यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे येऊन जखमींची विचारपूस केली तसेच घटनेबद्दल सविस्तर माहितीही घेतली. याठिकाणी महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, अग्निशमन विभागाचे उप आयुक्त मनोज लोणकर, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, डॉ. शिवाजी पवार, डॉ. काकासाहेब डोळे, तहसीलदार अर्चना निकम, विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध अधिकारी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे उपस्थित होते.यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक पाटील, डॉ.अनिकेत लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार अपेक्षा तोरणे, प्रियंका यादव, कविता राठोड, राधा उर्फ सुमन राठोड, उषा पाडवी, रेणुका ताथवडे, कमल चौरे, शरद सुतार, शिल्पा राठोड, प्रतिभा तोरणे अशी जखमींची नावे आहेत. मृतांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू आहे.अधिक माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ.विनायक पाटील (9822000413) आणि आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल (7276771077) यांचेशी संपर्क साधावा असे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

दरम्यान आगीची वर्दी मिळताच महापालिकेचे ७ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आहे.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!