Google Ad
Uncategorized

देवांग कोष्टी समाजाचा ४१ वा वधू-वर मेळावा उत्साहात संपन्न … ४५५ समाज बांधवांनी घेतला लाभ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि३५ डिसेंबर)  : देवांग कोष्टी समाजाचा ४१ वा राज्यव्यापी वधू-वर मेळावा नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स येथे रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कै. आलकाताई मुसळे यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व चौंडेश्वरी देवीच्या आरती ने करण्यात आले.

यावेळी समाजाच्या मागील ६५ वर्षाच्या इतिहासाचे विमोचन करणारे प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर लिखित ‘एक प्रेरक वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या समाज बांधवांना देवांग पुरस्कार, समजभूषण, आदर्श माता, आदर्श शिक्षक व आदर्श संस्था आदि पुरस्कारांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भा.ज. पा. अध्यक्ष शंकर जगताप, आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर उषा ढोरे, चौंडेश्वरी सूत गिरणीचे अध्यक्ष संजय कांबळे, अखिल भारतीय कोष्टा कोष्टीचे अध्यक्ष अरुण वरोडे, उद्योजक भूषण मुसळे, विटा नगर परिषदेचे उप नगराध्यक्ष किरण तारळेकर, वसंत म्हेत्रे, सुभाष नडे, शिवाजीराव मोहाळे, विष्णु कुटे, शेखर चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र राजापुरे, शारदा सोनवणे, सागर आंघोळकर, विजू आण्णा जगताप, सूर्यकांत गोफणे, सखाराम रेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष सुरेश तावरे यांनी केले. मेळाव्यासाठी ९०० उपवर वधू-वरांनी नोंदणी केली होती. मोफत आरोग्य शिबिरामध्ये ४५५ समाज बांधवांनी सहभाग नोंदवला. शिबिरात मोफत डोळे तपासणी, चष्मे वाटप, दंतरोग तपासणी, मधुमेह, रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी आदी सेवा उपलब्ध होते. प्रथमच समाजाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ४९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी समाजाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव तळपे यांनी केले. भगवान गोडसे यांनी उपस्थितांचे आभार मानले*

देवांग कोष्टी समाजाचा हा ४१ वा वधू वर मेळावा पार पडत आहे. गेल्या दहा वर्षांपासून सांगवी, पिंपळे गुरव परिसरात भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातुन विविध ठिकाणांहून समाज बांधव या महामेळाव्यास उपस्थित असतात. समाजाच्या वतीने वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या समाज बांधवांचा अशा महामेळाव्यात पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात येत असतो. मेळाव्यात समाजाची वधू-वर पुस्तिका प्रसिद्ध करून ती पुस्तिका वाटप करण्यात आली आहे. यामध्ये ५५० मुले तर ३५० हुन अधिक मुली यांनी नोंदणी केली आहे. याच पुस्तिकेच्या माध्यमातून जवळपास ८० टक्के विवाह जुळून येत असतात. पुण्यासारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा समाज बांधव एकत्रित येतो तेव्हा मला त्याचा अभिमान वाटतो. तसेच त्याचा मला मनःस्वी आनंदही होत आहे.
सुरेशदादा तावरे, अध्यक्ष देवांग कोष्टी समाज

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!