Google Ad
Uncategorized

प्रज्ञादिप सोशल फाउंडेशन चिखली यांचे सौजन्याने मोफत स्तन कर्करोग जनजागृती स्क्रिनिंग शिबीरात अनेक महिलांनी घेतला लाभ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि२१ फेब्रुवारी) :  मा डॉ अमोल कोल्हे खासदार शिरुर लोकसभा यांचे संकल्पनेतून व प्रज्ञादिप सोशल फाउंडेशन चिखली यांचे सौजन्याने मोफत स्तन कर्करोग जनजागृती स्क्रिनिंग शिबीर मंगळवार दिनांक २०/०२/२०२४ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३०-५० वयोगटातील सर्व महिलांची स्तन कर्करोग स्क्रिनिंग व जनजागृती महिला डॉक्टर कडून ( एकांत विशेष कक्षात गोपनीयते चे पालन) करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन चिखली येथे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली होती.सदर कार्यक्रमास डॉ प्रकाश ज्ञानोबा रोकडे संस्थापक अध्यक्ष प्रज्ञादिप सोशल फाउंडेशन चिखली, उपाध्यक्ष वैशाली बापुराव गायकवाड, प्रज्ञा प्रकाश रोकडे खजिनदार, ट्रस्टी रजनी दिलीप बागुल, जगदंब प्रतिष्ठान चे ईमरान सिद्दीकी , हेल्थ विदीन रिच फाऊंडेशन चे डॉ मुद्दसर शेख,राजेश हरगडे सामाजिक कार्यकर्ते साप्ताहिक वंदना ग्रुप चिखली चे सर्व सभासद व‌ महिला बचत गट व सफाई कर्मचारी महिला ई सुमारे १०० भगिनी उपस्थित होत्या.

सदर प्रसंगी डॉ प्रकाश ज्ञानोबा रोकडे यांनी स्तनाचा कर्करोग बाबत जनजागृती करताना खालील प्रमाणे माहिती देताना स्तन कर्करोग हा स्तनाच्या ग्रंथींमध्ये तयार होणारा कर्करोग आहे. शहरात प्रत्येकी २५ महिला मध्ये एकीला तर खेड्यात ३० महिला मध्ये एकीला स्तनांचा कर्करोग असण्याची शक्यता असते. ४० टक्के स्तनाचे कर्करोग हे वय वर्षे ३० ते ५० मध्ये आढळतात. स्तनाचे कर्करोगाने पिडीत ५०% रूग्ण हे ३ व ४ थ्या टप्प्यातील आढळून येतात.लवकर निदान झाले तर पहिल्या टप्प्यातील रुग्ण पुर्ण बरे होण्याचे प्रमाण ८०-९०% आहे.भारतात स्तनाचा कर्करोगाचे निदान दर ४ मिनिटाला १ रुग्णांमध्ये आढळून येते.

Google Ad

तसेच दर १३ मिनिटाला एक स्री स्तानाचे कर्करोगा मुळे दगावते. स्तन कर्करोगाची कारणे १) अनुवंशिकता २) दारु व्यसनाधीनता ३) लठ्ठपणा ४)रेडिएशन ५) वयोवृद्ध ६) ताणतणाव ७) स्तनपान न करु शकलेल्या महिला. गेली काही वर्षात स्तनाचा कर्करोगाचे प्रमाण ३०-५० वयोगटातील स्त्रियां मध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. राष्ट्रीय आरोग्य संस्थेचे पाहणीत स्तानाचे कर्करोगाने पिडीत रुग्णां मध्ये हाडे ठिसूळ होणेचे प्रमाण जास्त असले बाबत आढळून आले आहे.या आजारांवर उपाययोजना म्हणजे लवकरात लवकर स्तन कर्करोग स्क्रिनिंग व कर्करोग आढळून आला तर
लवकरच उपचार‌ करुन घ्यावेत असे आवाहन डॉ प्रकाश ज्ञानोबा रोकडे संस्थापक अध्यक्ष प्रज्ञादिप सोशल फाउंडेशन यांनी केले.

तसेच वाढते शहरीकरण व बदलेली जीवनशैली व जेवणात प्रक्रिया केलेले अन्न पदार्थांचा समावेश होतो ई कारणांमुळे आहे दातांचे आजाराचे प्रमाण वाढले आहे म्हणून प्रज्ञादिप सोशल फाउंडेशन व‌ Health Within Foundation वतीने मोफत दंत चिकित्सा व उपचार शिबीर वर नमूद ठिकाणी संपन्न झाले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन डॉ प्रकाश ज्ञानोबा रोकडे संस्थापक अध्यक्ष प्रज्ञादिप सोशल फाउंडेशन चिखली व सर्व ट्रस्टी यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदंब प्रतिष्ठान चे ईमरान सिद्दीकी , हेल्थ विदीन रिच फाऊंडेशन चे डॉ मुद्दसर शेख,साप्ताहिक वंदना ग्रुप चिखली मंजुषा गायकवाड महिला बचत गट व सर्व सभासद यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!