Google Ad
Uncategorized

जिल्हा रुग्णालय औंध, पुणे येथे १०० खाटांचे क्रिटिकल केअर हॉस्पिटल इमारत बांधकामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ फेब्रुवारी) : जिल्हा रुग्णालय औंध, पुणे येथे १०० खाटांचे क्रिटिकल केअर हॉस्पिटल इमारत बांधकामाचे भूमिपूजन कार्यक्रम रविवार दि. २५/०२/२०२४ रोजी संध्याकाळी ४.४५ ते ५.४५ वाजता. श्री. नरेन्द्र मोदी मा. पंतप्रधान, भारत सरकार यांच्या हस्ते डिजीटल पध्दतीने होणार आहे.

यावेळी अजित दादा पवार उपमुख्यमंत्री, मंत्री वित्त व नियोजन महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा, चंद्रकांत (दादा) पाटील मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य, दिलीप वळसे-पाटील मंत्री, सहकार महाराष्ट्र राज्य, डॉ. तानाजी सावंत आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य, डॉ. नीलम गो-हे, श्रीमती वंदना चव्हाण, खासदार श्रीमती सुप्रिया सुळे, आमदार श्रीमती आश्विनी जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे आमदार सुनिल टिंगरे, आमदार संजय जगताप, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार श्रीमती उमा खापरे, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार राहल कूल, आमदार अशोक पवार, आमदार अतुल बेनके, आमदार भिमराव, तापकीर, आमदार संग्राम थोपटे, आमदार सुनिल शेळके, आमदार सुनिल कांबळे हे उपस्थित राहणार आहेत.

Google Ad

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या पाहता जिल्हा रुग्णालय औंध, पुणे येथे १०० खाटांचे क्रिटिकल केअर हॉस्पिटलमुळे ससून अणि पिंपरी चिंचवड मनपाच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयावरील ताण कमी होणार असून पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर तसेच ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना येथील दर्जेदार आरोग्यसेवेचा फायदा होणार आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!