Google Ad
Uncategorized

फुकट्या प्रवाशांना बसणार दणका … रेल्वे करणार कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : रेल्वे प्रवाशांना वैध तिकीट काढून सन्मानाने प्रवास करण्याचे आवाहन करीत असते. परंतू तरीही प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असतात. त्यामुळे तिकीट काढून सन्मानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असते. पश्चिम रेल्वेने एप्रिल महिन्यात अडीच लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत तब्बल १७ कोटीच्या दंड वसूल केला आहे. यामध्ये ४.७१ कोटी रुपये दंड एकट्या मुंबई उपनगरी विभागात वसूल केला आहे.

दिवसेंदिवस लोकल व डेमूमध्ये तिकीट न काढताच प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने लोकल, डेमूसारख्या गाड्यांमध्ये तिकीट पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. आता ४० तिकीट पर्यवेक्षक वेगवेगळ्या गाड्यांमधून फिरून प्रवाशांचे तिकीट तपासतील. ज्यांच्याकडे तिकीट नसेल, अशा फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

Google Ad

पुणे ते लोणावळा लोकलच्या रोज ४१ फेऱ्या होतात, तर पुणे रेल्वे स्थानकावरून दररोज सुमारे २५० प्रवासी गाड्या धावतात. याच पार्श्वभूमीवर पुणे ते दौंड दरम्यान धावणाऱ्या डेमू तसेच हडपसर ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजरमध्येही तिकीट पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. विना तिकीट प्रवास करताना प्रवासी आढळला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. याशिवाय, स्कॉडची देखील करडी नजर राहणार आहे. तेव्हा प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा. असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!