Google Ad
Uncategorized

भोसरी येथे ‘समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थे’चा दुसरा वर्धापन दिन उत्साहात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ ऑगस्ट) : दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचा दुसरा वर्धापन दिन भोसरी येथे उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ONP लीला हॉस्पिटलच्या डायरेक्टर बालरोगतज्ञ डॉक्टर अमिता फडणीस तसेच मिगा फॅशन इन्स्टिट्यूट च्या डायरेक्टर प्राजक्ता गावडे उपस्थित होत्या.

एस एम बी एस (SMBS)च्या सदस्यांनी मंगळागौर गणेश वंदना फॅशन शो अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण बाईपण भारी देवा चा डान्स होते. यावेळी संस्थेमधून सक्षम झालेल्या जवळपास दहापेक्षा जास्त लघु उद्योजिकांचा” एसएमएस सक्षम उद्योजिका “या पुरस्काराने गौरव केला.

Google Ad

तसेच येणाऱ्या काळात एसएमएस चे महिलांनी बनवलेले गृह उपयोगी वस्तू चे रुद्र उद्योग समूह नावाने टाय अप केलेजे लवकरच बाजारात आणि मॉल मध्ये दिसणार आहे यातून महिलांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळणार आहे.
तसेच संस्थेच्या संस्थापिका सौ राजश्रीताई गागरे यांनी सांगितले की भविष्यात एस एम एस चा महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचा मॉल लवकरच असणार आहे. एस एम बी एस चे डिजिटल ॲपही लवकरच येणार आहे . महिलांनी यावेळी महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत राहील आणि अजून सक्षम महिलांना संस्थेमध्ये जोडील अशी शपथ ही घेतली .

यावेळी प्रमुख पाहुण्या बोलल्या की अशी महिला सक्षमीकरणासाठी वास्तव स्वरूपात काम करणारी संस्था पाहून आनंद झाला. यावेळी संस्थेतील उत्तम ग्राहक म्हणून स्वाती कट्टे ,मीना आखाडे आणि माधवी जनार्दन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्तम विक्रेता म्हणून सोनल मलातपुरे, स्वाती हरगापुरे ,संगीता सुपल, संगीता क्षीरसागर आणि सोनल गराडे यांना गौरविण्यात आले. संस्थेचा आतापर्यंतचा दोन वर्षाचा प्रेरणादायी प्रवास पीपीटी द्वारे दाखविण्यात आला.

तसेच संस्थेमधील सक्रिय असणाऱ्या संगीताताई लांडे यांना एसएमएस आधारस्तंभ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी जवळपास 500 पेक्षा जास्त सदस्य कार्यक्रमाला उपस्थित होते आतापर्यंत संस्थेने जवळपास दीड हजार पेक्षा जास्त लघु उद्योजकांचा सदस्य टप्पा पार केला असून भविष्यात हा टप्पा निश्चितच वाढता असेल . यावेळी आर्किटेक्ट शिवानी गागरे ,विजयाताई राऊत तसेच डॉक्टर दिपाली कुलकर्णी ही उपस्थित होत्या.

सदस्यांनी संस्थेमधून कसा आत्मविश्वास आणि व्यवसाय वाढला हे मनोगत यावेळी व्यक्त केले. येणाऱ्या काळात समर्थ महिला बहुउद्देशीय संस्थेचे झंजावाती महिला सक्षमीकरणाचे काम लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर करणार असे यावेळी संस्थेच्या संस्थापिका राजश्रीताई गागरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल वाघ आणि मीनाताई आखाडे यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!