Google Ad
Uncategorized

बैलगाडा शर्यत घाट,भोसरी’ येथे पिंपरी चिंचवड मनपाच्या ‘स्वच्छतेसाठी एक तास’ श्रमदान करून ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेमध्ये २०० जवानांचा सहभाग

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ०७ (भोसरी गावठाण) येथे गांधी जयंती निमित्त पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करून स्वच्छता ही सेवा या मोहिमेमध्ये शहरातील अनेक जण सहभागी झाले होते,’बैलगाडा शर्यत घाट,भोसरी’ येथे

राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेची सुरुवात स्वच्छतेची शपथ “मी शपथ घेतो की मी दरवर्षी शंभर तास श्रमदान करून स्वच्छतेच्या संकल्पना माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवेल ….” अशी शपथ घेतली गेली.

Google Ad

या वेळी भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा किसनराव लांडगे साहेब, उल्हास जगताप (अतिरिक्त आयुक्त -३),  रामदास तांबे साहेब (सह शहर अभियंता),  राजेश आगळे (‘ इ ‘क्षेत्रीय अधिकारी ),  सुधीर ठाकूर साहेब( ब्रिगेडियर, सीएमई), मा. प्रशांत जस्सल (कर्नल, सीएमई), मा. सोनल राजपूत (लेफ्टनंट कर्नल सीएमई),मा. दत्ता साहेब (लेफ्टनंट कर्नल, सीएमई), राजेश भाट साहेब( सहायक आरोग्य अधिकारी ) मा.नगरसेवक संतोष लोंढे, नितीन लांडगे ,सोनाली ताई गव्हाणे , नम्रता लोंढे, राजेंद्र लांडगे, मुख्य आरोग्य निरीक्षक अतुल सोनवणे, आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, बेसिक झोनल इन्चार्ज स्नेहल गोरे हे उपस्थित होते.

सुमारे २०० सीएमई जवान, पोलिस कर्मचारी, बचत गटातील महिला, नागरिक,स्वच्छ्ता दूत,असे सुमारे ५०० नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन सुमारे 1.5 टन कचरा संकलित केला. पी.सी.एम.सी चे ब्रँड ॲम्बेसेडर कु. पुजा शेलार (शिवछत्रपती पुरस्कार विजेती) श्री.सुरेश डोळस साहेब (ज्येष्ठ सिनेकलाकार ) यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली….

सदर कार्यक्रमात चहापाण्याची व्यवस्था “शून्य कचरा” या संकल्पनेत राबविण्यात आला असून प्लास्टिक बॉटल ऐवजी स्टीलचे ग्लास, डिस्पोजेबल कप ऐवजी काचेचे ग्लास व कप तसेच डीस्पोजेबल प्लेट ऐवजी स्टीलच्या प्लेट वापरण्यात आल्या होत्या. यावेळी उपस्थित सन्माननियांचा सत्कार पुष्पगुच्छ ऐवजी शोभिवंत फुलांचे रोपटे देऊन करण्यात आला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!