Google Ad
Uncategorized

जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या मंदिरासाठी … समर्थ एज्युकेशन सोसायटी चे शेळके परिवाराकडून १ लाख ११ हजार १११ रुपये

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ एप्रिल) : जगद्गुरु संत तुकोबाराय ह्यांच्या मंदिरासाठी समर्थ एज्युकेशन सोसायटी चे शेळके परिवाराकडून १ लाख ११ हजार १११ रुपये देण्यात आले. आध्यत्मिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात व्रत घेऊन कार्य करणाऱ्या परिवारातील ज्यांचे परिवाराचे ४० एकर क्षेत्रातील इंजीनियरिंग, पॉलीटेक्निक, आयटीआय, व्यवस्थापन, आणि फार्मा कॉलेज, लॉ कॉलेज, केजी टू पीजी, असा भव्य दिव्य कॅम्पस असणारे पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य समर्थ शैक्षणिक संकुल, समर्थ एज्युकेशन सोसायटी चे सचिव व महराष्ट्रातील नामवंत शरदचंद्र पतसंस्थेचे संचालक, एक आदर्श, शिस्तप्रिय, बाणेदार आणि बुद्धिमान व्यक्तीमत्व मार्गदर्शक  मा. विवेक शेळके सर यांना राजुरी येथील त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन वाढदिवसाच्या निमित्ताने श्री क्षेत्र भंडारा डोंगर चे वतीने जगद्गुरु संत तुकोबाराय ह्यांचा प्रसाद व शाल देऊन ह भ प पंकज महाराज गावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .

ह्या वेळी गावडे महाराज यांचे प्रिय बंधूतुल्य, जुन्नर तालुक्यातील एक प्रभावशाली नेतृत्व वल्लभ शेळके सर, आम्हांस सर्वांना आपल्या प्रेमाने जिंकून घेणारे आजादशत्रू राजुरी चे ज्येष्ठ नेते, मा. सरपंच माऊली शेठ शेळके आणि शिक्षण क्षेत्रात प्रचंड त्यागाच्या बळावर कार्य करणारे मंगळूर झापवाडी चे बोरी येथील संस्थेचे प्राचार्य संतोष कासाळ सर हे गेली २० वर्ष निस्वार्थी भावनेने शेकडो विद्यार्थ्यांचे दर वर्षी पालकत्व घेऊन शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी ज्यांचे कार्य आहे ते ही उपस्थित होते.

Google Ad

ह्या प्रसंगी मा. वल्लभ शेळके सर यांनी श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील जगद्गुरु संत तुकोबाराय ह्यांच्या मंदिरासाठी चाललेल्या कार्याचे कौतुक करून आपल्या परिवाराच्या वतीने १ लाख, ११ हजार, १११ रुपये योगदान जाहीर केले, जगद्गुरु संत तुकोबाराय ह्यांच्या कृपेने पांडुरंगाचे चरणी प्रार्थना की ह्या सर्व परिवारावर परमेश्वरा तुमची कृपा कायम असो द्यावी, असेडॉ. पंकज महाराज गावडे म्हणाले.

 

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!