Google Ad
Uncategorized

पुणे – नाशिकसह या 7 जिल्ह्यांत 1.75 लाख घरांवर सोलर बसणार ! दरमहा 300 युनिट वीज फ्री, कसा घ्याल या योजनेचा लाभ ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ फेब्रुवारी) : 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 कोटी घरांवर छतावर सौरऊर्जा बसविण्याच्या लक्ष्यासह “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करण्यासाठी बैठक घेतली होती. पंतप्रधानांनी बैठकीदरम्यान सांगितले होते की, सौरऊर्जेचा वापर छप्पर असलेल्या प्रत्येक घराने त्यांचे वीज बिल कमी करण्यासाठी आणि त्यांना विजेच्या गरजांसाठी खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवता येईल..

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचे उद्दिष्ट कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना रूफटॉप सौर उर्जेच्या स्थापनेद्वारे वीज उपलब्ध करून देणे, तसेच अतिरिक्त वीज निर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हे आहे. रहिवासी क्षेत्रातील ग्राहकांना छतावरील सौरऊर्जेचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्यास प्रवृत्त करण्यासाठी एक व्यापक राष्ट्रीय मोहीम सुरू करावी, असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले होते.

Google Ad

आता त्या पार्श्वभूमीवर राज्यातील 7 जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात 25 हजार सोलर सिस्टीमचे उद्दिष्ट ठेऊन तब्बल पावणेदोन लाख सोलर 31 मार्च 2024 पर्यंत बसवण्याची मुदत देण्यात आली आहे.

या योजनेत राज्यातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, नागपूरबरोबरच अकोला जिल्ह्याचाही समावेश आहे. या प्रत्येक जिल्ह्यात 25 हजार घराच्या छतांवर सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट आहे. केंद्र शासनाकडून सौर पॅनेलसाठी 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार असून, जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

सौर पॅनेल स्थापित करण्यासाठी आकारमान किती असावं..

या योजनेंतर्गत सौर पॅनेल बसविण्यासाठी नागरिकांना 1 KW सौर पॅनेल बसविण्यासाठी 10 चौरस मीटर जागा असणे आवश्यक आहे. यासोबतच कार्यालये आणि कारखान्यांच्या छतावर सोलर पॅनल बसवल्यास विजेचा खर्च 30 ते 50 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. यासोबतच नागरिकांना 3 किलोवॅटपर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 40% सवलत दिली जाईल, तर 3 KW ते 10 KW सोलर पॅनल बसवण्यासाठी 20% सवलत दिली जाईल..

सोलर रुफटॉप योजनेअंतर्गत कसा कराल अर्ज..

भारत सरकारच्या मोफत सोलर रूफटॉप योजनेअंतर्गत, ज्या नागरिकांना त्यांच्या घरात सौर पॅनेल बसवायचे आहेत त्यांनी solarrooftop.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून या योजनेअंतर्गत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. केवळ अर्जाच्या आधारे, त्यांना योजनेंतर्गत सौर रूफटॉपसाठी लाभ दिला जाईल.

सौर रूफटॉप योजना ऑनलाइन लागू करण्यासाठी महावितरणच्या  https://css.mahadiscom.in/ या व्हेबसाईटवर आपला ग्राहक क्रमांक टाकून अर्ज करावा..

टीप : तुम्ही हा फॉर्म CSC, जनसेवा केंद्रावरही भरू शकता.

आपल्या घराच्या छतावर ‘रूफटॉप सोलर’ बसवण्यासाठी आजच संपर्क करा (जाहिरात) : 

https://www.a2svcard.in/SHELAR’S-SOLAR-POWER

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!