Google Ad
Uncategorized

कोकणचे युवा नेते नितेशजी राणे यांनी कोकण वासियांना केले अश्विनी जगताप यांना मतदान करण्याचे आवाहन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ फेब्रुवारी) : भाजपा महायुतीच्या उमेदवार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या प्रचार दौऱ्या दरम्यान कोकणचे युवा नेते नितेशजी राणे यांनी काल कोकण वासियांना संपर्क साधून चिंचवड विधानसभेमध्ये असलेल्या सर्व कोकण वासियांना त्यांनी आवाहन केले, स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांची अपुरी असलेली या शहरातील कामे पूर्ण करण्याकरिता व कोकण वासियांच्या शहरातील समस्या सोडविण्याकरिता अश्विनीताईंना निवडून देणे गरजेचे आहे, आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहावे असे आवाहन केले. यावेळी थेरगाव, चिंचवडगाव, काळेवाडी, रहाटणी, सांगवी या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी बैठका घेऊन सांगवी मध्ये कौटुंबिक मेळावा घेण्यात आला.

मेळाव्यालाही कोकण वासिय मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला दौऱ्यादरम्यान मिळालेले प्रेम पाहून कोकण वासियांच्या समस्या सोडविण्याकरिता यापुढे कायम मी आपल्या संपर्कात राहीन असे आश्वासन दिले, यावेळी कोकणवासियांच्यां समस्यांचे निवेदन देण्यात आले. दौऱ्याचे नियोजन सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ अध्यक्ष अजय पाताडे व त्यांचे सहकारी यांनी केले .

Google Ad
Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!
join_whatsapp