Pune : राष्ट्रवादीचा युवा नेता, दंगलखोर! कोण आहे राजकुमार ढाकणे ज्याची फडणवीसांच्या तक्रारीवरून हकालपट्टी झालीय?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९जुलै) : महाराष्ट्र राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाचे सदस्य राजकुमार ढाकणे याची हकालपट्टी करण्यात आली आहे. तपासात ढाकणेविरोधात हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी राजकुमार ढाकणे याच्या नियुक्तीवरुन मोठा वादंग उठला होता. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ढाकणेच्या नियुक्तीला आक्षेप घेतला होता. यासंदर्भातील चौकशी अहवालानंतर ठाकरे सरकारने ढाकणेला हटवण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे

राजकुमार ढाकणे याचा सिक्युरिटी पुरवण्याचा व्यवसाय
पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या सिक्युरिटी गार्डने कामाचे पूर्ण पैसे मागितल्यावर त्याच्या डोक्यात लायसन्स रिव्हॉल्वरचा दस्ता मारुन त्याला गंभीर जखमी केलं होतं. याप्रकरणी 2015 मध्ये दाखल गुन्ह्याची न्यायालयात सुनावणी सुरु
याच प्रकरणात ढाकणे अटक असतानाही पळून गेल्याचा दुसरा गुन्हाही दाखल (2015)
कोरेगाव पार्क पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा करण्यात आली होती (2016)
जागेवर अतिक्रमण करून कट करून फसवणूक केल्याचा गुन्हा (2017)
पुणे महापालिकेचे अतिक्रमण कारवाईला विरोध केल्याचे दोन गुन्हे

फिनिक्स मॉलमध्ये बेकायदा घुसून दंगल माजवल्याचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाणे (2014)
रुबी हास्पिटलचे डॉक्टर सदरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांकडे तक्रार
राजकुमार ढाकणे याच्या डीआर एन्टरप्रायजेसकडे असलेल्या खारगर टोल नाक्याच्या वसुलीचा 10 कोटीचा महसूल बुडाल्याने पोलीस बंदोबस्तात हा टोल त्याच्याकडून एप्रिल 2019 मध्ये काढून घेऊन एमएसआरडीसीकडे देण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या पोलिस ट्रिब्युनल अर्थात पोलिस तक्रार प्राधिकरणावर गृह विभागाने केलेल्या राजकुमार ढाकणेच्या नियुक्तीवरुन गेल्या वर्षीच मोठा वादंग उठला होता. देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्तीला विरोध करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं. पोलिस खात्यातील अंतर्गत तक्रार सोडवण्याचं काम करत असलेल्या आणि सत्र न्यायालयाइतके अधिकार असलेल्या या पदावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पुण्यातल्या राजकुमार ढाकणे या व्यक्तीची नेमणूक करण्यात आल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला होता.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

12 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago