YAVAT : तरुणांनी चोरीसाठी लढवली अनोखी शक्कल … युट्युबवरील व्हिडीओ पाहून एटीएम फोडले, चोरी पद्धत ऐकून तुम्हीही जाल चक्रावून

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जानेवारी) : पुणे जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीबरोबरच चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. चोरी कारण्यासाठी चोरांकडून आता युट्युबचा आधार घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दौंड  जवळ असलेल्या यवत गावाजवळ असलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम कापून त्यामधून 23लाख 80  हजार 700 रुपये चोरी गेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी एमटीम फोडणाऱ्या टोळीला अटक केली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर चौकशीत आरोपींनी धक्कादायक माहिती दिली आहे.

एटीएमफोडण्यासाठी युटूबवरील व्हिडिओची मदत घेतल्याची माहिती पोलिसांना दिल्याने पोलिसही चक्रावून गेलं आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अजय रमेशराव शेंडे (वय 32, दौंड), शिवाजी उत्तम गरड (वय25,वाशीम), ऋषिकेश काकासाहेब किरतिके (वय 22, उस्मानाबाद) यांना अटक केली आहे.

अशी फोडली एटीएम पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या आरोपींनी यु ट्युबवरुन घरफोडी व एटीएम चोरी कशी करायची, याची माहिती गोळा केली. इतकंच नव्हेतर चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य ऑनलाईन मागविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींनी गॅस कटरच्या साहयाने ही चोरी केली होती. त्यांच्याकडून 10 लाख रुपये व मोरीची मोटारसायकल, गॅस कटर व इतर साहित्य जप्त केले.

बाबत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यवत येथील महाराष्ट्र बँकेची एटीएम कापून चोरट्यांनी 23 लाख 80 हजार700 रुपये चोरुन नेले होते. 17  जानेवारी रोजी पहाटे अडीच ते चार वाजण्याच्या दरम्यान हा दरोडा टाकण्यात आला होता. त्याअगोदर 16  जानेवारीला कुरकुंभ येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

6 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

6 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago