Categories: Editor Choice

यमुनानगर येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सरोज कदम आयोजित मंगळागौर कार्यक्रमात महिलांनी केली धमाल

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.22ऑगस्ट : केशवराव ठाकरे स्टेडियम यमुनानगर येथे सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सरोज कदम यांनी आयोजित केलेल्या मंगळागौर कार्यक्रमांमध्ये महालक्ष्मी महिला मंडळ, मानकरी ग्रुप, पूजा गरुड पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांचे सर्व पदाधिकारी व सभासद त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मोनिका बंगाळ यांनी या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास प्रमुख भूमिका बजावल्या या कार्यक्रमांमध्ये विविध खेळांसाठी विविध बक्षीस योजना होत्या त्यामध्ये विशेष ताट सजावटीसाठी मिनाक्षी पोंगळे दोनशे एक रुपये बक्षीस, सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा धारण करणार्‍या संतोषी सोनवणे पाचशे एक रुपये बक्षीस त्याचप्रमाणे मानकरी ग्रुप यांना पाचशे एक रुपयाचं बक्षीस देण्यात आले,टाळ ग्रुपला पाचशे एक, लहान मुलांमध्ये अजिंक्य आणि रेणुका यांनी विठ्ठल रखुमाई यांची वेशभूषा धारण केली होती त्यांना दोनशे एक रुपयांचे बक्षीस मिळाले. त्याचप्रमाणे यमुनानगर येथील उषा बनसोडे यांनी सुंदर गीत सादर केले.दमयंती नेरकर यांनी जुन्या हिंदी गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले.
धमाल मस्ती करत हा कार्यक्रम आनंदाने साजरा करण्यात आला.

महालक्ष्मी महिला मंडळाच्या अध्यक्षा अश्विनी बागुल, उपाध्यक्षा प्राजक्ता पांढरकर व सभासद सुनंदा पेंदे मिनाक्षी उबाळे , संगीता भालेराव मंगळ काळसुरे, अनिता पोंक्षे, सुनिता कदम, शालिनी पाटील, शोभा वाईकर, उषा सोनवणे ,शारदा बागुल, कल्पना सोनी, त्याचप्रमाणे मानकरी ग्रुप च्या पूजा गरुड, पोलीस नागरिक मित्र संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाबुराव फडतरे कार्यकारी अध्यक्ष सुनील राणे उपाध्यक्ष किरण पाचपांडे खजिनदार शितल एरंडोल सभासद आरती बावणे, वर्षा वासनिक, कविता बॅनर्जी इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते या सर्वांनी सरोज कदम यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असलेल्या व महिलांची ज्यांना उत्सुकता होती ती अभिनेत्री मोनिका बंगाळ या कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण ठरल्या. त्याचप्रमाणे महिलांनी फुगडी, फेर डान्स, गाणी सादर करीत मंगळागौर साजरी केली.उपस्थित सर्व महिलांना भेट वस्तु देण्यात आल्या. उपस्थित सर्व महिलांचे व स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धक महिलांचे कार्यक्रमाच्या मुख्य संयोजक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सरोज कदम यांनी आभार मानले.

Maharashtra14 News

Recent Posts

Teens Category मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने जिंकला ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब चिंचवडमध्ये पारंपरिक जल्लोषात संपन्न भव्य सोहळा

Teens Category मध्ये भोसरीच्या शर्वरी कांबळेने जिंकला ‘श्रावण सुंदरी 2025’चा किताब महाराष्ट्र 14 न्यूज, दि.21…

1 day ago

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा – २०२५ … उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारकडून पुरस्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 21 ऑगस्ट -- उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारकडून पुरस्का देण्यासाठी…

1 day ago

शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था यांना गणपती उत्सवासाठी दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या परवानग्या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी दि.१९ ऑगस्ट २०२५:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय…

3 days ago

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्वपूर्ण निर्णय! जाणून घ्या…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.19 ऑगस्ट -- देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चार…

3 days ago