Categories: Editor Choice

“जुने ते सोने” … दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व जुनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ‘आजी आजोबा यांचा सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक: १६-९-२२) : नवी सांगवी येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित, दि न्यू मिलेनियम इंग्लिश मिडियम स्कुल व जुनियर कॉलेज यांच्या संयुक्त सहभागाने ‘आजी आजोबा यांचा सत्कार समारंभ’ दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या सदस्या मा.स्वाती पवार मॅडम उपस्थित होत्या.तर अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या स्कूल व कॉलेजच्या प्राचार्या मा.इनायत मुजावर मॅडम उपस्थित होत्या. मा.मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली.सुरवातीस विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले.

प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा.जयश्री माळी मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकातून आजी आजोबांचे जीवनातील महत्व यावर अत्यंत सुंदर अशा शब्दात मत व्यक्त केले. व नंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. सुरुवातीस आलेले सर्व आजी आजोबा यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.नंतर इयत्ता ७वी ची कु.शिगवण, कु.साक्षी सोनकाते, व यांनी आपल्या आजी आजोबां विषयी अत्यंत सुंदर शब्दात मनोगते व्यक्त केले. तर कु. देवयानी आबनावे, कु.सेजल पवार, कु.प्रणाली चौहाण, जानवी जाधव, या ७ वीच्या मुलींनी ‘दादी अम्मा, दादी अम्मा मान जाओ’ हे गीत गाऊन सगळ्यांचे मनोरंजन केले.

तर इयत्ता ८ वी च्या मुलांनी आजी आजोबांवर सुंदर अशी छोटी नाटिका सादर केली.नंतर मा.प्राचार्य इनायत मुजावर मॅडम यांनी हल्लीच्या धावपळीच्या युगात एकत्र कुटुंबासमवेत आजी-आजोबांना किती महत्त्व आहे, हे स्पष्ट करताना सांगितले की, आजी आजोबा घरात असायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला देखील मुलांच्या नशीबात असावे लागते, असे म्हणतात कारण आजी आजोबा म्हणजे कुटुंबाचा आधारवड असतो. आजी आजोबा म्हणजे अशी व्यक्ती जी नातवंडांची पहिली मित्र-मैत्रिण असते. कारण प्रेम ही सर्वात मोठी भेट आहे, जी एक पिढी दुसऱ्या पिढीला देऊ शकते.

म्हणून कुटुंबात आजी-आजोबा असणे खूप महत्त्वाचे आहे.तर प्रमुख पाहुण्या म्हणून मा.स्वाती पवार मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, जर प्रगतीकडे वाटचाल करायची असेल, व मुलांवर उत्तम संस्कार करायचे असेल, तर एकत्र कुटुंब पद्धती ही जीवनात खुप महत्त्वाची आहे, हे सांगताना हल्लीच्या या धकाधकीच्या जीवनात अनेकदा पालक आपल्या मुलांसोबत दर्जेदार वेळ घालू शकत नाही, व त्यामुळे मुले वाईट मार्गाचा अवलंब करू शकतात .म्हणूनच जर घरात आजी-आजोबा असेल तर त्यांच्या उपस्थितीत जीवनातील नैतिकता आणि मूलभूत मूल्य शिकू लागतात .

जेव्हा आजी-आजोबांच्या जवळ ही मुले असतात, तेव्हा त्यांना एकमेकांसोबत शेअरिंग आणि काळजी घेण्याच्या सवयी लागतात, तसेच आई-वडील जेव्हा मुलांना रागवतात, तेव्हा आजी आजोबा हेच नातवंडांचे खरे समर्थक असतात, म्हणूनच त्यांना का जपायचे तर ते घरातील सर्वात जुने सदस्य असतात, आणि प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात प्रभावशाली आणि महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असतात. म्हणूनच त्यांना खूप महत्त्व द्यावे, कुटुंबात मानाचे स्थान असावे, तरच कुटुंब व्यवस्था जिवंत टिकेल, अन्यथा कुटुंबाचा ऱ्हास होण्यास वेळ लागणार नाही असे आपले मत अत्यंत सुंदर शब्दात व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव मा. शंकर शेठ जगताप, मा. विजू अण्णा जगताप, सदस्य मा. स्वाती पवार मॅडम,मा. देवराम पिंजण सर, तसेच मा. प्राचार्या मुजावर मॅडम, मा.मुख्याध्यापिका जयश्री माळी मॅडम, प्राथमिक माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षक वृंद हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकजा मॅडम यांनी तर आभार प्राजक्ता मॅडम यांनी केले. अशाप्रकारे एका नव्या उमेदीने नव्या प्रेरणेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

9 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago