Categories: Editor Choice

पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतातील बहुआयामी व्यक्तिमत्व हरपले … महापौर माई ढोरे

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १२ फेब्रुवारी २०२२ : प्रसिद्ध उद्योजक आणि माजी खासदार पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतातील बहुआयामी व्यक्तिमत्व हरपले असून देशासह पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली अर्पण केली.

या शहरात बजाज उद्योग समूहाने कारखाना उभा करून मोठ्या प्रमाणावर कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या औद्योगिक नगरीच्या जडणघडणीत बजाज समूहाचा महत्त्वाचा वाटा आहे. बजाज समूहाचे मानद अध्यक्ष असलेले राहुल बजाज हे गेल्या अनेक वर्षासून आकुर्डी येथील बजाज कारखाना परिसरात वास्तव्य करीत होते. ऑटोमोबाईल क्षेत्राला त्यांनी अधिक चालना देऊन बळकटी देण्याचे काम केले. सामाजिक भान असलेल्या आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या राहुल बजाज यांनी कोविड काळात सी एस आर फंडाच्या माध्यमातून औषधे तसेच वैद्यकीय साहित्यासह रुग्णवाहिका वाहनांची देखील महापालिकेला मदत केली.

२ लाख कोविड लसींचा मोफत पुरवठा केला. दुसऱ्या कोविड लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासत असताना राहुल बजाज यांनी तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले. गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ही सेवा पोहोचली पाहिजे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. राहुल बजाज यांचे कार्य औद्योगिक नगरीच्या इतिहासात कायमस्वरूपी अधोरेखित झाले असून शहरातील उद्योजकांसह देशभरातील उद्योजकांना त्यांचे कार्य सतत मार्गदर्शक ठरेल.

समस्त पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या वतीने राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते, असे महापौर माई ढोरे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

20 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

5 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

5 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago