Categories: Editor ChoiceSports

IPL Auction 2022 : अवघ्या 5 मिनिटात ‘तो’ बनला करोडपती, किंमती होती 60 लाख, मिळाले 8.5 कोटी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ फेब्रुवारी) : बैंगलोर – जगातील सर्वात श्रीमंत टी-20 क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल स्पर्धेचा महालिलाव बैगलोर येथे सुरू आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी दोन दिवस मेगा ऑक्शन होत आहे. आज या महालिलावाचा पहिला दिवस आहे. आणि लिलावात पहिल्याच दिवशी अनेक भारतीय खेळाडू करोडपती झाले आहे.

यंदाच्या लिलावाचं खास वैशिष्ट म्हणजे, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्ससह लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ लीगमध्ये सहभागी झाले आहेत.

दरम्यान, भारतीय खेळाडूला यंदाच्या लिलावाने मालामाल केलं आहे. यामध्ये काही अनकॅप इंडियन खेळाडूंचा सुद्धा समावेश आहे. मागील वर्षी कोलकत्ता नाईट राईडर्स संघाकडून खेळलेल्या राहूल त्रिपाठीने यावर्षी लिलावात आपली बेस प्राईस फक्त 60 लाख रुपये ठेवली होती. मात्र जेव्हा या अनकॅप इंडियन खेळाडूचं लिलावात नावं आलं. तेव्हा अनेक संघांनी त्याचावर झडपच टाकली.

सीएसके, कोलकत्ता, सनराईज हैदराबाद, या संघांनी राहूल त्रिपाठीवर बोली लावण्यास सुरूवात केली आणि पाहता पाहता हा खेळाडू 60 लाखाहून थेट 8.5 कोटींवर पोहचला. सीएके आणि सनराईज हैदराबाद या संघामध्ये राहूल त्रिपाठीला खरेदी करण्यास चांगलीच चूरस बघायला मिळाली. मात्र अखेर सनराईज हैदराबादने राहूल त्रिपाठीला 8.5 कोटींमध्ये खरेदी केलं.
राहूल त्रिपाठी याच्यानंतर मागच्या वर्षी प्रीती झिंटाच्या पंजाब टीमकडून खेळलेला विस्फोटक फलंदाज शाहरूख खान या अनकॅप इंडियन खेळाडूवर सुद्धा मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. यंदाच्या लिलावात शाहरूख खानने आपली बेस प्राईज 60 लाख रुपये ठेवली आहे.

▶️कुणाच्या ताफ्यात कोणता खेळाडू?

1) चेन्नई सुपर किंग्ज- ड्वेन ब्रावो (4.4 कोटी), अंबाती रायडू (6.75 कोटी), रॉबिन उथप्पा (2 कोटी), दीपक चहर (14 कोटी),
2) मुंबई इंडियन्स- ईशान किशन (15.25 कोटी)
3) दिल्ली कॅपिटल्स- डेविड वार्नर (6.25 कोटी), मिशेल मार्शची (6.50 कोटी), शार्दुल ठाकूर (10.75 कोटी), मुस्ताफिजूर रेहमान (2 कोटी), कुलदीप यादव (2 कोटी)
4) कोलकाता नाईट रायडर्स- श्रेयस अय्यर (12.25 कोटी), पॅट कमिंस (7.25 कोटी), नितीश राणा (8 कोटी), राहूल त्रिपाठी (8.5 कोटी) शिवम मावी (7.25 कोटी)

5) गुजरात टायटन्स- मोहम्मद शामी (6.25 कोटी), जेसन रॉय (2 कोटी), लॉकी फर्ग्युसन (10 कोटी)
6) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- फाफ डू प्लेसीस (7 कोटी), हर्षल पटेल (10.75), वानिंदु हसरंगा (10.75 कोटी), दिनेश कार्तिक (5.50 कोटी), जॉश हेजलवूड (7.5 कोटी)
7) लखनऊ सुपर जायंट्स- मनीष पांडेला (4.60 कोटी), जेसन होल्डर (8.75 कोटी), दीपक हुड्डा (5.75 कोटी), कृणाल पांड्या (8.75), क्विंटन डी कॉक (6.75), मार्क वूड (7.50 कोटी)
8) राजस्थान रॉयल्स- आर अश्विन (5 कोटी), ट्रेन्ट बोल्ट (8 कोटी), शिमरॉन हेटमायर (8.50 कोटी), देवदत्त पडीकल (7.50 कोटी), युजवेंद्र चहल (6.50

9) पंजाब किंग्ज- शिखर धवन (8.25 कोटी), कगिसो रबाडा (9.25 कोटी), जॉनी बेयरेस्टो (6.75),
10) सनरायझर्स हैदराबाद- वॉशिंन्टन सुंदर ( 8.75 कोटी), निकलस पूरन (10.75 कोटी), टी नजराजन (4 कोटी),

▶️हे खेळाडू राहिले अनसोल्ड –

मोहम्मद नबी, मॅथ्यू वेड, वृद्धीमान साहा, सुरेश रैना, स्टीव स्मिथ, शाकिब अल हसन आणि डेविड मिलर, सॅम बिलिंग्स, उमेश यादव, आदील रशीद, जीब जादरान, इमरान ताहीर, अॅडम झम्पा, आमित मिश्रा पहिल्या दिवशी अनसोल्ड राहिले. दुसऱ्या दिवशी अखेरीस या खेळाडूंवर पुन्हा बोली लागणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

2 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

3 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago