Google Ad
Uncategorized

पवार गटाची निवडणूक आयोगाकडे धाव, पुण्यातील राष्ट्रवादीचे ते दोन आमदार अपात्र होणार?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.११ सप्टेंबर) : राष्ट्रवादीचे दोन्ही गट पक्षात फूट पडली नसल्याचं सांगत असले तरी दोन्ही गटाकडून एकमेकांना शह काटशह देण्याचं काम सुरू केलं आहे. दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत.

पक्ष आणि चिन्ह आपल्याच ताब्यात राहावा म्हणून दोन्ही गटाकडून कसून प्रयत्न होत आहे. दोन्ही गटाकडून निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करून पक्षावर दावा केला जात आहे. आमचाच पक्ष खरा असल्याचा दावाही केला जात आहे. पक्ष आणि चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गटाकडून आटापिटा सुरू असतानाच आता आणखी माहिती समोर आली आहे. पुण्यातील दोन आमदारांचं भवितव्य टांगणीला लावणारी ही बातमी आहे.

Google Ad

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अपात्र आमदारांच्या पाठवलेल्या यादीत पुण्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. सुनील टिंगरे आणि चेतन तुपे या दोन आमदारांची नावे आहेत. त्यामुळे या दोन्ही आमदारांची आमदारकी जाणार की राहणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, त्यावर चेतन तुपे यांनी याबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र अजितदादांसोबत असल्यानं अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!