महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ ऑगस्ट) : शिवसेना हा पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कोणाचे याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी दोन मिनिटात होऊ शकत नाही, असे निरीक्षण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी नोंदवले आहे
थोडक्यात ही सुनावणी ताबडतोब घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे हे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्रात जून 2022 मधील सत्तासंघर्षानंतर शिवसेना पक्ष कोणाचा आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण हे कोणाचे याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या संदर्भातील सुनावणीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने मुद्दा मांडताना वकिलांनी 370 कलमाचा संदर्भ मांडला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुनावणी होईल असे म्हटले होते. त्याबाबत वकिलांनी संदर्भ देताच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी टिप्पणी केली की, शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी दोन मिनिटात होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावे.
काय आहे प्रकरण –
जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेना पक्ष फोडला. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले. शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण यावर शिंदे गटाने दावा केला. तो भारतीय निवडणूक आयोगाने मान्य केला. निवडणूक आयोगाच्या त्या निकालाला आणि निर्णयाला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी 370 कलमबाबत सुनावणी झाल्यानंतर शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह याबाबत सुनावणी होईल हे स्पष्ट केले होते.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण –
यासंदर्भात नियमानुसार नवीन पक्षाची घटना ही निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर अद्यापही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आधीची उपलब्ध असलेली घटना आणि नंतरची घटना म्हणजे दोन्ही पक्षांच्या घटना एक समान अभ्यासता येतील, असे स्पष्टीकरण सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगाने दिले आहे.
निवडणूक आयोगाचा निकाल –
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार? यासंदर्भात निवडणूक आयोगासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली होती. निवडणूक आयोगाने १८ फेब्रुवारीला याप्रकरणी निकाल दिला होता. आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय दिला होता. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला होता.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि..04 ऑगस्ट :- पिंपरी-चिंचवड शहरातील सामान्य जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याची जागेवरच…
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ ऑगस्ट २०२५ :* कधी कुणी नात्यांपासून दूर गेलेलं, तर कुणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…
महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…