Google Ad
Uncategorized

राज्यात खळबळ : अण्णा हजारे यांची हत्या करणार … कुणी दिली धमकी? काय दिला इशारा?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि १२एप्रिल : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करणार असल्याचा इशारा एका संतप्त नागरिकाने दिला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकी देण्यात आली आहे. अण्णा हजारे यांची हत्या करणार, अशी धमकी देण्यात आली आहे.

एका संतप्त नागरिकाने हा इशारा दिलाय. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका गावातील शेतीच्या वादातून हा इशारा देण्यात आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून एका कुटुंबावर अन्याय होत असल्याची भावना, कुटुंबियांची आहे. शेतीच्या वादातून कुटुंबावर अन्याय झाला, असा आरोप ठेवण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव गावातील ही घटना आहे. शेतीच्या वादातून गटातील 96 जणांनी संतोष गायधने यांच्या परीवारावर दबाव आणला. खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न केला.

Google Ad

काय दिला इशारा?

शेतीचा वाद आणि खोट्या केसेसच्या भीती गायधने कुटुंबाने अखेर टोकाची भूमिका घेतली आहे. या प्रकरणात त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह वरीष्ठ पोलीस अधिकारी तसेच मंत्र्यांनाही निवेदन दिले होते. मात्र त्यांच्याकडूनही काहीच कारवाई झाली नाही, असा आरोप गायधने कुटुंबियांनी केलाय. अखेर या कुटुंबाने राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे. 1 मे रोजी अण्णा हजारेंची राळेगण सिद्धीत जावून हत्या करणार, असा इशारा श्रीरामपूरातील संतोष गायधने यांनी दिलाय. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. अण्णा हजारेंच्या समर्थकांमधून याचे पडसाद उमटत आहेत.

हे कुटूंब भीतीच्या सावटाखाली जगतंय. अण्णा हजारेंसह वरीष्ठ पोलीस आणि मंत्र्यांनाही याबाबत निवेदन देण्यात आलं होतं. मात्र काहीच कारवाई होत नसल्याने गायधने कुटूंब हतबल झालं. त्यांनी राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागितली. मात्र आता श्रीरामपूरातील संतोष गायधने यांनी अण्णा हजारे यांना मारण्याचा इशारा दिला आहे. 1 मे रोजी अण्णा हजारेंची राळेगण सिद्धीत जावून हत्या करणार असा इशाराच या कुटुंबाने दिला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!