महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ फेब्रुवारी) : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिले आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक खरी शिवसेना, भाजप व इतर मित्र पक्ष यांच्या महायुतीची असणार आहे. चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), रासप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम संघटना, प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणी येथील शिवेंद्र लॉन्समध्ये आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
पिंपरी-चिंचवडमधील शास्तीकर माफीचा शासन आदेश लवकरच काढला जाईल. तसेच अनधिकृत बांधकामांसाठी यापुढे कोणताही मोर्चा काढावा लागणार नाही. हा प्रश्न ठाण्याप्रमाणे कायमचा निकालात काढला जाईल. तसेच प्राधिकरणाचा साडेबारा टक्के जमीन परताव्याचा विषयही सिडकोप्रमाणे तातडीने मार्गी लावणार आहे. तसेच पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. या शहरातील एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही ही जबाबदारी माझी असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (दि. २२) केली. माझ्या मुख्यमंत्री होण्यात भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचाही सिंहाचा वाटा, हिस्सा, सहभाग, प्रेम होते, अशा भावना व्यक्त करून पोटनिवडणुकीत भाजपच्या अश्विनी लक्ष्मण जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी खासदार अमर साबळे, भरत गोगावले, माजी महापौर माई ढोरे, आयपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, मी जे बोलतो, ते करतो. त्यामुळेच राज्यात इतिहास घडवला आहे. मी कार्यकर्त्यातून मुख्यमंत्री झालो आहे म्हणून आपल्याला खुर्ची मिळाल्यावर कार्यकर्त्यांना विसरता कामा नये.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…