Categories: Editor Choice

पुणे तिथे काय उणे, मांजर पाळताय? पिंपरी चिंचवड तसेचपुणेकरांना आधी घ्यावी लागेल महापालिकेची परवानगी

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि. ११ नोव्हेंबर) : पुणे शहरात घरात मांजर पाळण्यासंदर्भात पुणे महापालिकेने नवीन नियम केला आहे. यापुढे पुणेकरांना मांजर पाळायचे असल्यास त्यासंदर्भात रीतसर परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली असून, पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑन- लाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे.

महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार मांजर, कुत्रा, घोडे अशा पाळीव प्राण्यांना घरी ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नोंदणी करून त्यासाठी रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र,आत्तापर्यंत केवळ कुत्रा आणि घोडे पाळण्यासाठीच परवानगी दिली जात होती.

महापालिकेच्या माहितीनुसार शहरात १ लाखापर्यंत पाळीव कुत्रे आहेत, पण आत्तापर्यंत केवळ ५ हजार ५०० कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे झालेली आहे. मांजराची नोंदणी करण्यासाठी वार्षिक ५० रुपये इतके शुल्क निश्‍चीत केले आहे. नोंदणीसाठी नागरिकांच्या रहिवासी पुरावा, ॲटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो या तीन कागदपत्रांची गरज आहे. दरवर्षी नव्याने नोंदणी करावी लागेल.

या नूतनीकरण करताना ५० रुपये परवाना शुल्कशिवाय अतिरिक्त २५ रुपये शुल्क घेतले जाणार आहे. यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पाळीव प्राण्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढत आहे. अनेक शेजारच्या घरात खूप मांजर पाळले आहेत, त्यांचा त्रास होतो. अशा अनेत तक्रारी देखिल समोर आल्या आहेत.

पिंपरी चिंचवड मनपाचे असे असेल धोरण :

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील भटक्या व मोकाट उपद्रवकारक मांजरांची संख्या मर्यादित राहावी.  याकरिता धोरण अवलंबित आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडूनही पाळीव मांजरांची माहिती संकलित करून त्यानुसार त्यांचे आरोग्य व उपद्रवाबाबतच्या उपाययोजना यावर योग्य नियोजन करण्यासाठी पाळीव मांजरींकरीता महापालिकेच्या वतीने ऑनलाईन परवाना देण्यात येणार आहे.

या विषयास  स्थायी समितीसह महापालिका सभेची मान्यता आवश्यक आहे. या विषया बद्दल माहिती देताना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे म्हणाले की, श्वानांइतकेच मांजराना देखील पाळण्यासाठी  शुल्क आकारण्यात येणार असून त्यासाठीचा परवाना दिला जाईल. नवीन परवाना काढण्यासाठी ७५ रुपये शुल्क आकारण्यात येणार असून परवाना नुतनीकरणासाठी ५० रुपये द्यावे लागणार आहे. परवाना नुतनीकरण करण्यास विलंब केल्यास १० रुपये विलंब शुल्क आकारले जाणार आहे.

  मांजर पाळण्याच्या  परवान्याकरीता अटी व शर्ती लागू आहेत. या परवान्याची कायदेशीर मुदत परवाना प्राप्त झाल्यापासून एक वर्षापर्यंत असून तो दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक राहील. महापालिका आयुक्त यांनी वेळोवेळी ठरविलेले शुल्क अदा केल्यानंतर अटी व शर्तीस अधीन राहुन हा परवाना देण्यात येईल. परवाना धारकाने प्राप्त परवाना सोबत बाळगणे आवश्यक राहील व तो महापालिका आयुक्त किंवा त्यांनी नेमणुक केलेल्या प्राधिकृत अधिका-याने मागणी करताच सादर करणे आवश्यक राहील. पाळलेल्या मांजराचे रेबीज लसीकरण करणे संबंधित मालकांवर बंधनकारक राहील. परवाना धारकाने सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मांजर मोकळे सोडता कामा नयेतसेच या मांजरापासून इतरांना दुखापत होणार नाही, सार्वजनिक आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्या मांजरीमुळे कुठल्याही प्रकारची घाण निर्माण होणार नाही, मांजरापासून कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही याची परवाना धारकाने दक्षता घेणे आवश्यक असणार आहे.

मुंबई प्रांतिक म.न.पा. अधिनियम १९४९ प्रकरण परिशिष्ट १४ नियम २२ सह कलम ३८६ (१) यामधील नियम व तरतुदी परवाना धारकावर बंधनकारक राहतील. कोणत्याही व्यक्तीला मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ प्रकरण परिशिष्ट १४ नियम २२ (१) (अ) अन्वये परवाना प्राप्त केल्याशिवाय मांजर पाळता येणार नाही. परंतु परवाना घेतला असेल आणि त्याचे नुतनीकरण केले नसल्यास विना परवाना मांजर पाळले आहेअसे समजण्यात येऊन नियमानुसार कारवाईस संबंधित व्यक्ती पात्र राहणार आहे. हा  परवाना घेतल्यानंतर मानवी आरोग्यास तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या कारणावरून महापालिकेकडे तक्रार प्राप्त झाल्यास तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कारवाई करणे  किंवा दिलेला परवाना रद्द करण्याचे अधिकार महापालिकेकडे राखीव असणार आहेत, अशी माहिती डॉ. दगडे यांनी दिली.

पाळीव प्राण्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढत आहे. अनेक शेजारच्या घरात खूप मांजर पाळले आहेत, त्यांचा त्रास होतो. अशा अनेत तक्रारी देखिल समोर आल्या आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

2 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

2 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

3 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

3 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago

पावणेचार लाखांच्या मताधिक्याने मावळची निवडून जिंकू; पत्रकार परिषदेत संजोग वाघेरे पाटील यांचा विश्वास

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 17 (प्रतिनिधी) - जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तशी प्रचारात रंगत…

1 week ago