Categories: Editor Choice

भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगतापांनी … जवानांना मानवंदना देण्यासाठी साडेआठ हजार किलोमीटर प्रवास करणाऱ्या वाकडमधील पाच बाईक राइडर्सना दिल्या शुभेच्छा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि ११ नोव्हेंबर) : भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त वाकडमधील पाच बाईक रायडर तरूणांनी देशाची अविरत सेवा करणाऱ्या जवानांना मानवंदना देण्यासाठी पुणे ते अरुणाचल प्रदेशमधील काहो ते परत पुणे असा साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास करण्यास सुरूवात केली आहे. या पाचही तरुणांना भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी सुरक्षित प्रवासासाठी शनिवारी (दि. १२) शुभेच्छा दिल्या. देशभावना जागृत करण्यासाठी आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी अशा मोहिमा राबवाव्यात, असे मत शंकर जगताप यांनी व्यक्त केले.

देशभरात भारताच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्त वाकडमधील पाच बाईक रायडर तरुणांनी एकत्र येत देशाची अविरत सेवा करणाऱ्या जवानांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्याचा निर्णय घेतला. हे पाचही बाईक रायडर तरुण पुणे ते गुजरातमधील नारायण सरोवर पुढे अरूणाचल प्रदेशमधील काहो ते पुन्हा पुणे असा तब्बल ८ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. या प्रवासाला त्यांनी आजपासून (शनिवार) सुरूवात केली आहे.

वैभव रहाटे, राहुल मोकाशी, संदीप कटके, राहुल हंकारे, महेंद्र शेवाळे असे त्या पाच बाईक रायडर तरुणांची नावे आहेत. त्यांची ही बाईक राईड इंडिया बुक रेकॉर्डस आणि एशियन रेकॉर्डसमध्ये नोंदवली जाणार आहे. या बाईक राईडला उद्योजक कुणाल मराठे यांनी प्रोत्साहन दिले आहे.

या पाचही तरुणांच्या प्रवासाला भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. नागरिकांमध्ये देशभावना जागृत करण्यासाठी आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी अशा मोहिमा राबवाव्यात, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सागर अंगोळकर, अंबरनाथ कांबळे, विनायक गायकवाड, संजय मराठे, साई कोंढरे, संकेत कुटे आदी उपस्थित होते.

दरम्यान, याच पाच बाईक रायडर तरुणांनी २०१९ मध्ये कन्याकुमारी ते लद्दाख ते पुणे असा ८ हजार किलोमीटरचा प्रवास केला होता. या प्रवासात त्यांनी “से नो टू प्लॅस्टिक” म्हणजेच पर्यावरणाला धोका असलेल्या प्लॅस्टिकचा वापर करू नका, असा संदेश दिला होता. या बाईक रायडची इंडिया बुक्स ऑफ रेकॉर्ड अँड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

1 day ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago