Google Ad
Editor Choice

आम्ही पक्षाच्या पाठीमागे आहोत. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, ” : शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २५ जानेवारी २०२३) :- ” दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी शेवट पर्यंत पक्षनिष्ठा जपली. विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीवेळी लक्ष्मण जगताप हे मतदानासाठी गेले होते. पक्षनिष्ठा काय हे त्यांनी दाखवून दिले. आम्ही अद्याप दुःखातून सवरलेलो नाहीत. घरात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. पक्षाने आम्हाला बैठकीला बोलावले म्हणून आलो आहोत.

आमच्या जगताप कुटुंबात उमेदवारी तिकीट द्यावं हे आमचे म्हणणं नाही. आम्ही पक्षाच्या पाठीमागे आहोत. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल, ” असे दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांचे बंधू आणि माजी नगरसेवक शंकर जगताप म्हणाले आहेत.

Google Ad

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कासारवाडी येथे भाजपा पदाधिकाऱ्यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना शंकर जगताप यांनी माहिती दिली. बैठकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप, आमदार महेश लांडगे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!