Categories: Editor Choice

Washington : बिग ब्रेकिंग – बायडेन बहुमताच्या जवळ … अध्यक्षपदासाठी हवं एक राज्य!

महाराष्ट्र 14 न्यूज : अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचे (US Presidential Election 2020) निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत. निर्णायक मानल्या जात असणाऱ्या तीन राज्यांमधलं एक जो बायडन (Joe Bidden near majority) यांनी जिंकलं आहे. आता ते 270 आकड्याच्या जवळ आहेत. त्यामुळे आता डोनल्ड ट्रम्प (Donald Trump)यांच्यापुढे उरलेली सगळी राज्य जिंकण्यावाचून गत्यंतर उरलेलं नाही. उलट जो बिडेन यांना आणखी एका राज्यात विजय मिळाला तर ते अध्यक्षपदावर विराजमान होऊ शकतील, अशी परिस्थिती आहे.

अमेरिकेच्या या वर्षीच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे तीन राज्यांचा कल. विस्कॉन्सिन, मिशिगन आणि पेनसिव्हेनिया या तीन राज्यांपैकी बायडन यांनी विस्कॉन्सिन जिंकलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठी विजयी आघाडी आणखी अवघड झाली आहे. या विजयामुळे जो बायडन बहुमताच्या जवळ पोहोचले आहेत. त्याबरोबर ट्रम्प यांचे मतमोजणीबाबतचे आरोप आणखी वाढले आहेत. मिशिगनमध्ये मतमोजणी थांबवण्याची जोरदार मागणी ट्रम्प यांनी केली आहे.

जाहीर झालेल्या इलेक्टोरल वोट्सच्या आकड्यांनुसार जो बायडेन यांच्याकडे 264 जागा आहेत. तर ट्रम्प यांच्याकडे 213 चा आकडा जमला आहे. बहुमतासाठी 270 जागा जिंकाव्या लागतात. ट्रम्प यांचे समर्थक डेट्रॉइट आणि फीनिक्स इथल्या वोटिंग सेंटरबाहेर एकत्र जमायला सुरुवात झाली आहे. फीनिक्समध्ये ट्रम्प समर्थकांनी मतमोजणी थांबवण्याची मागणी केली आहे. अजूनही काही राज्यांमधून निकाल स्पष्टपणे समोर आलेला नाही.

त्यामध्ये अलास्का, अॅरिझोना, जॉर्जिया, नेवाडा, नॉर्थ केरोलिना आणि पेन्सिल्व्हानिया ही राज्य आहेत. ही सगळी राज्य ट्रम्प यांनी जिंकली तरच त्यांची अध्यक्षपदाची गरज पूर्ण होऊ शकेल. अन्यथा बायडेन यांचा विजय निश्चित आहे.
पण इथून निकाल यायला वेळ लागला आणि मतांमधला फरक फारसा नसेल तर मात्र निकाल चांगलाच रखडणार अशी चिन्हं आहेत. ट्रम्प कोर्टात जाण्याचा दावा करत आहेत, तसे ते खरंच गेले, तर कदाचित महिनाभरसुद्धा अमेरिकेचा नवा अध्यक्ष कोण होणार हे ठरू शकणार नाही.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

3 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

6 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

6 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

1 week ago