सावधान : खाजगी रुग्णालयांतील वैद्यकीय बीलांचे होणार शासन निर्णयानुसार पुर्वलेखापरिक्षण!

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि . ५ जून २०२१) : कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर आकारण्यात येणा – या वैद्यकीय बीलांचे शासन निर्णयानुसार पुर्वलेखापरिक्षण केले जाणार आहे . शासनाने निर्गमित केलेल्या आदेशाचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन होणार नाही याबाबत खाजगी रुग्णालयांनी दक्षता घेण्यात यावी अशी सुचना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी केली .

कोविड -१ ९ अंतर्गत राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या अधिसुचनेनुसार खाजगी रुग्णालयांनी वैद्यकीय बीलांची आकारणी करण्याबाबत तसेच महापालिकेने नेमलेल्या लेखापरिक्षण पथकाबरोबर समन्वय ठेवण्यासाठी आज शहरातील कोविड -१ ९ उपचार करणा – या खाजगी रुग्णालयांच्या डॉक्टर तथा संचालकांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती .

चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश , महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , मुख्यलेखापरिक्षक अमोद कुंभोजकर , सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . लक्ष्मण गोफणे , ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ . शिवाजी ढगे , डॉ . शैलजा भावसार , डॉ . सुजाता साळवे , बील पडताळणी समिती प्रमुख तथा सहशहर अभियंता श्रीकांत सवणे , उपअभियंता विजय भोजने आदी उपस्थित होते .

कोरोना महामारीमध्ये अनेकांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले आहे . अनेकांना मानसिक , शारीरिक त्रास सोसावा लागला . अशा वेळी मानवी संवेदना जागृत ठेवून प्रत्येकाने सेवा दिली पाहिजे , असे नमुद करुन आयुक्त पाटील म्हणाले , लोकभावना समजून घेण्याची नितांत गरज आहे . रुग्ण दगावल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना बीलाकरीता अडवणूक करणे योग्य नाही . कोरोना रुग्णांवरील उपचारांचे दर शासनाने निश्चित करुन दिले आहेत .

यादराप्रमाणे रुग्णालयाने आकारणी करुन बील दिले पाहिजे . बीलाबाबत वाढणा – या तक्रारी उद्भवू नयेत यासाठी बीलांचे प्री ऑडीट करण्यात येणार आहे . त्यामुळे संबंधित रुग्णालयाने वेळेत बील तयार करावे , ते एकत्रित बील असावे . योग्य कारणासाठी रुग्णालयांना असल्यास महापालिकेचे सहकार्य असेल . महापालिका प्रशासनाला लेखापरिक्षणाबाबत रुग्णालयाने सहकार्य करावे असे आयुक्त पाटील यांनी सांगितले .

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले , नियमांचे उल्लंघन कोणीही करु नये अन्यथा कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल . वैद्यकीय सेवेला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाचा सहभाग महत्वाचा असतो . मात्र अवाजवी बीलांसारख्या तक्रारी उद्भवू नयेत याची दक्षता रुग्णालयांनी घ्यावी . यावेळी मुख्यलेखापरिक्षक अमोद कुंभोजकर , सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . लक्ष्मण गोफणे , ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ . शिवाजी ढगे , बील पडताळणी समिती प्रमुख श्रीकांत सवणे यांनी बीलांचे प्री ऑडीटबाबत उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले .

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

20 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago