पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पथ विक्रेत्यांचे निवडणूक प्रभाग निहाय होणार सर्वेक्षण

महाराष्ट्र 14 न्यूज , ( दि . २१ ऑक्टोबर २०२० ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पथ विक्रेत्यांचे निवडणूक प्रभाग निहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे . या कामासाठी येणा – या खर्चासह विविध विकाम कामांसाठी येणा – या सुमारे ४० कोटी ९१ लाख रुपयांच्या विषयांना स्थायी समितीने मान्यता दिली . महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली . सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते .

शहरातील पथ विक्रेत्यांचे खासगी संस्थेमार्फत सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे . साधारणपणे ३० दिवसांच्या कालावधीत सर्वेक्षण पुर्ण केले जाईल . येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सर्हेक्षणाला सुरुवात होईल . सकाळी ८ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ८ वाजेपर्यंतच्या दोन वेळांच्या मध्यामध्ये सर्व्हेक्षणाचे कामकाज केले जाणार आहे . प्रत्येक वॉर्डाच्या निवडणूक प्रभाग निहाय या कामाचे नियोजन असेल . सर्व्हेक्षण करताना खासगी मस्थेव्दारे प्रत्यक्ष जागेवर जाऊन पथ विक्रेत्याचे त्याच्या व्यवसायासह छायाचित्र घेतले जाईल.

शिवाय आवश्यक माहिती शासनाच्या संगणकीय प्रणालीमध्ये तसेच महापालिकेने विकसीत केलेल्या नमुन्यामध्ये भरली जाणार आहे . मनुष्यबळ , सर्व्हेक्षण , माहिती जमा आणि अपलोड करणे , ओळखपत्र देणे , पथ विक्रेता प्रमाणपत्र देणे आणि आवश्यकतेनुसार दुरुस्त्या करणे ही जबाबदारी संबंधित खामगी संस्थेची असणार आहे . याकामी महापालिकेच्या वतीने रितसर वृतपत्रीय जाहिरात देऊन इच्छुक संस्थांकडुन दर मागविण्यात येणार आहे . विहित केलेल्या अटी शर्तीनुसार शहरातील पथ विक्रेत्यांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी खासगी एजन्मीची नेमणुक करण्यास आणि याकामी येणा – या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली .

महापालिकेच्या अ , क , ड , इ , फ , ग आणि ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणा – या विविध उद्याने यांच्या देखभाल आणि संरक्षणासाठी सुमारे ५ कोटी २८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत . कासारवाडी येथे सुमारे १ कोटी ९ ० लाख रुपये खर्च करुन भाजी मंडई विकसीत करण्यात येणार आहे . अ , ब आणि ग क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात प्रभाग क्र .१९ तसेच २१ च्या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ३४ लाख रुपये खर्च येणार आहे .

प्रभाग क्र .८ मधील जयगणेश साम्राज्य चौक ते क्रांती चौका पर्यंतच्या परिसरात फुटपाथ कलर पेव्हींग ब्लॉक बसविण्यात येणार आहे . यासाठी १ कोटी ९ ० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे . या खर्चाम स्थायी समितीने मंजुरी दिली . औंध वाकड सांगवी रस्त्यावरील मुळा नदीवर अस्तित्वात असणा – या ८ मीटर रुंदीच्या पुला शेजारी वाढीव २२ मीटर रुंदीचा पुल बांधण्यात येणार आहे . पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमध्ये हा पुल उभारण्यासाठी येणारा खर्च विभागला जाणार आहे .

दोनही महापालिकांमध्ये आपसात ठरल्यानुसार बांधकामाची निविदा काढणा – या अथवा पुलाचे बांधकाम करणा – या महापालिकेकडे ५० टक्के खर्च जमा करायचा आहे . हा पुल पुणे महापालिका बांधणार असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वाटयाला येणारी सुमारे २० कोटी रक्कम पुणे महानगरपालिकेला अदा करण्यात येणार आहे . हा खर्च अदा करण्यास स्थायी ममितीने मान्यता दिली .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago