‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाचा प्रभाग क्र. २९ आणि प्रभाग क्र. ३१ मध्ये प्रारंभ … नागरिकांनी सहकार्य करण्याचे लोकप्रतिनिधींचे आवाहन!

महाराष्ट्र 14 न्यूज : ‘आमदार लक्ष्मण जगताप’ आणि भा.ज.पा.शहराध्यक्ष आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटंब माझी जबाबदारी ह्या मोहिमेस आज सोमवार ( ता. २१ ) प्रभाग क्रमांक २९ सुदर्शन नगर पिंपळे गुरव येथे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. यावेळी या भागातील नगरसेवक ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत आप्पा कदम, नगरसेवक सागर आंगोळकर स्वीकृत नगरसेवक महेशदादा जगताप नगरसेविका उषाताई मुंढे, नगरसेविका चंदाताई लोखंडे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भा.ज.पा.चे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.

तसेच आज प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी – पिंपळे गुरव येथेही ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली . या वेळी प्रभागातील नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेविका माधवी राजापुरे , सिमाताई चौगुले, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष राजेंद्र राजापुरे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि भा.ज.पा.चे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

संपुर्ण पिंपरी चिंचवड शहरात या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून, संपूर्ण शहरात तसेच नवी सांगवी, पिंपळे गुरव हा परिसर कोरोना मुक्त करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार असून येथील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी शासकीय यंत्रणा तपासणी करणार असली तरी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभागही फार गरजेचा आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाचा विचार करून, या मोहिमेत एकत्रितपणे सहभागी व्हा.

सर्व लोकप्रतिनिधी, भा.ज.पा.चे सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, तसेच नागरिकांनी स्वयंफुर्तीने सामाजिक बांधिलकी म्हणुन पुढे येऊन कोणताही संकोच न ठेवता, भीती न बाळगता तपासणीसाठी सहकार्य करा. या आरोग्य मोहिमेत सर्वांनी एकत्रितपणे सहभागी होण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट वाढत असताना पिंपळे गुरव येथील जनतेचे जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासन व प्रभागातील नगरसेवक आणि नगरसेविका, भा.ज.पा.पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सर्व सुविधा उभारत आहोत. लॉकडाऊन काळातही त्यानी ही लाट थोपविली होती. मागील अनेक महिन्यांपासून प्रशासनासह अहोरात्र मेहनत करीत आहेत. मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करावा लागेल.

यासाठी लागणाऱ्या सर्व वैद्यकीय सामुग्री उपलब्ध करून देण्यात येईल. पल्स ऑक्सीमीटर, थर्मल गन, ॲटीजेन किट इ. साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या प्रभागातील नगरसेवक , नगरसेविका व महानगरपालिका कटिबद्ध आहे.

स्वयंसेवक (आरोग्य दूत) आपल्या कडे माहितीसाठी (तपासणी करिता) आल्यानंतर त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच भा.ज.पा.च्या सर्व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख यांना विनंती आहे की आपण स्वयंसेवकांना आपल्या भागात मदत करावी. असे आवाहन यावेळी सर्व लोक प्रतिनिधींच्या वतीने नागरिकांना करण्यात आले.

 

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago