Categories: Editor Choice

वाकड येथील सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)सरचिटणीसपदी निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जानेवारी) : वाकड गावचे युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते रमजान सय्यद यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यांना या निवडीचे पत्र राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी महापौर संजोग भाऊ वाघेरे यावेळी विशाल वाकडकर (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा ), रविकांत वरपे (प्रदेश कार्य अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र),फजल भाई शेख (मा.शिक्षण मंडळ) व इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी युवकचे माजी शहराध्यक्ष आदरणीय नगरसेवक मयुर शेठ कलाटे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकारणात काम करण्यास सुरुवात केली आहे.

सय्यद यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय आहे. परिसरात राष्ट्रवादीचे समर्थक म्हणून ते काम करत होते. त्यांनी धार्मिक विचार न ठेवता अनेकदा आपल्या समाजसह इतर समाजातील गरजवंतांना देखील वेळोवेळी मदत आणि सहकार्य केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 hours ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

20 hours ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

4 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

7 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

1 week ago