Categories: Editor Choice

पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले यांना एक वर्ष मुदतवाढ

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३१ डिसेंबर) : मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची मुदत एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिकेतील भा.वी. कांबळे पत्रकार कक्षामध्ये महापौर माई ढोरे व सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके,अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते विद्यमान अध्यक्ष अनिल वडघुले यांचा सत्कार करण्यात आला.महापौर, सत्तारूढ पक्ष नेते व पत्रकार मित्रांनी वडघुले यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे, पिंपरी चिंचवड सोशल मीडिया अध्यक्ष सुरज साळवे व दैनिक, साप्ताहिक, डिजिटल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाची मुदत २० डिसेंबर रोजी संपली असल्याकारणाने निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. परंतु कोरोनाचया काळात झालेल्या लाॅकडाउन मुळे
अध्यक्ष अनिल वडघुले यांना काम करण्यास अडचणी निर्माण झाल्याने कामे करता आली नाहीत त्यामुळे संघाच्या सदस्यांनी मेसेज, ईमेल व पत्राद्वारे जिल्हा कमिटीकडे कालावधी वाढवून देण्यासाठी विनंती केली होती.या बाबद परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर,सचिव  बापूसाहेब गोरे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर, सुनिल जगताप आणि परिषद कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनि सदस्यांच्या मागणीचा विचार करून व अनिल वडघुले त्यांच्या कामाची दखल घेत एक वर्षासाठी त्यांना अध्यक्षपद वाढून देण्याचे मान्य करून तसे पत्रही दिले आहे.
अध्यक्षपदासाठी संघातील बहुसंख्य सदस्यांनी जिल्हा कमिटीकडे कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी केल्यामुळे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांनी जिल्हा पातळीवर चर्चा करून वडघुले  यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात  निवडणुका होणार नाहीत असे निश्चित झाले आहे.
येणाऱ्या काळात पत्रकारांवरील हल्ले, जाहिरात बिले न मिळणे, पत्रकारांच्या निवाऱ्याचा प्रश्न, पत्रकार भवन, डिजिटल मीडियाला अधिकृत मान्यता या साठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करणे
अशा अनेक समस्या साठी लढा देणार असल्याचे अध्यक्ष अनिल  वडघुले यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वरिष्ठांचे अध्यक्षपदास मुदत वाढून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
Maharashtra14 News

Recent Posts

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

9 hours ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

4 days ago

गरीब, कष्टकरी व आदिवासींना मोदींनी न्याय दिला – खासदार बारणे … आपटा गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (उरण, दि. 25 एप्रिल) : गरीब कष्टकरी व आदिवासी लोकांना न्याय मिळवून…

4 days ago

‘दादां’च्या चिरंजिवांच्या ‘वाय प्लस’ दर्जाची सिक्युरिटीचे नेमके कारण काय?

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय…

4 days ago

पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत सेक्टर ऑफिसर्स यांना ईव्हीएम सिलिंगचे प्रशिक्षण…

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे…

4 days ago

स्वच्छतेच्या मोहिमेत महिला बचत गटांचा सहभाग वाढविणार, आणखी ४९ सामुदायिक शाैचालये चालविण्यास देणार…

महाराष्ट्र 14 न्यूज,  दि. १९ (प्रतिनिधी) -* पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला…

1 week ago