Google Ad
Uncategorized

सर्वोच्च न्यायालय म्हणतंय, … मतदारच राजा, त्यांना उमेदवाराची माहिती जाणून घेण्याचा अधिकार!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ जुलै) : निवडणुकीला उभारलेल्या उमेदवाराची सर्व माहिती जाणून घेण्याचा अधिकार मतदारांना आहे, असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. मतदान करणं हा देशातील नागरिकांचा हक्क आहे, तसं माहिती जाणून घेणं हा ही अधिकार मतदारांना आहे.

न्यायमूर्ती एस. रवींद्र भट आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने हे मत मांडलं आहे. त्यांनी सांगितलं, की मतदानाचा हक्क हा अमूल्य आहे. प्रदीर्घ आणि कठोर स्वातंत्र्यलढ्याचा परिणाम म्हणून हा हक्क देशाच्या प्रत्येक नागरिकाला मिळाला आहे. त्यामुळे हा नागरिकांचा अविभाज्य अधिकार असल्याचं ते म्हणाले.

Google Ad

लोकशाही ही राज्यघटनेची एक अत्यावश्यक बाब आहे. मात्र, तरीही मतदानाचा अधिकार हा केवळ वैधानिक अधिकार मानला जातो. भारतात मतदानाचा हक्क हा मूलभूत अधिकारांमध्ये गणला जात नाही हा मोठा विरोधाभास असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने यावेळी व्यक्त केलं.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!