Categories: Uncategorized

आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब हल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ नोव्हेंबर) : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयावर आज (दि.२३ नोव्हेंबर) दुपारी पावणे तिनच्या सुमारास तीन अज्ञातांनी पेट्रोलच्या बाटल्या फेकण्याची घटना घडली आहे . मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास पिंपळेगुरव येथे ही घटना घडली . यात कोणतीही वित्त किंवा मनुष्य हानी झालेली नाही . याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे .

आज दुपारी पावणे तीनच्या सुमारास एका दुचाकी वाहनावरून तिघेजण चंद्ररंग डेव्हलपर्स या शंकर जगताप यांच्या कार्यालयासमोर थांबले . त्यातील दोघांनी कार्यालयाच्या दिशेने पेट्रोलने भरलेल्या बाटल्या फेकल्या . आणि त्यानंतर ते अज्ञात तिघेजण घटनास्थळावरून पळून गेले .

सांगवी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार , पिंपळे गुरव येथील पेट्रोलपंपाजवळ माजी नगरसेवक शंकर जगताप यांचे ‘ चंद्ररंग ‘ डेव्हलपर्सचे कार्यालय आहे .

हल्यामागील कारणांचा तपास सुरू आहे . या घटनेनंतर ताडतीने पोलीस पथक दाखल झाले असून, त्यांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासले असता , त्यात एका गाडीवर तिघांनी येऊन बाटल्या फेकल्याचे फुटेज मध्ये दिसत आहे . तसेच आलेल्या दुचाकीच्या नंबर प्लेटवर काळे फासल्याचे दिसून आले . त्यानंतर सहाच्या सुमारास आयुक्त कृष्णप्रकाश यांनी घटनास्थळास भेट दिली आहे . तसेच शहरात नाकेबंदी केली आहे . तपासासाठी पाच पथके तयार केल्याचे पोलीसांनी सांगितले . असून आरोपींना शोधून काढण्यात पोलीस पथक यशस्वी होईल असे या तपास कार्यातून प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

यावेळी बोलताना शंकर जगताप म्हणाले, आमचा कोणावरही सवंशय नाही, तसेच कार्यकत्यांनी संयम ठेऊन पोलिस प्रशासनास सहकार्य करावे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago