महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ डिसेंबर) : वैविध्यपूर्ण अनुभवांची श्रीमंती आणि सळसळता उत्साह यांच्या संमिलनाने आजचा कट्टा गाजला.. उपस्थित मान्यवरांनी आपल्या अनुभवाची शिदोरी खुली केली आणि सगळ्यांनाच एक आनंददायी अनुभव दिला.
आजचे मानकरी होते… मा. विकास (नाना) दांगट, मा. संतोषजी नांगरे, बांधकाम व्यावसायिक विवेकजी देशपांडे, महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारी आर्या भागवत. या सर्वांचे औक्षण करून शंखनादाने स्वागत करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांना शिंदेशाही पगडी, मानाची शाल, मोत्याची माळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना विकास (नाना) दांगट यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पुणे जिल्हा बँक यांच्याशी संबंधित विविध अनुभव सांगितले. या दोन्ही संस्थांचे शेतकऱ्यांच्या जीवनात किती महत्त्वाचे स्थान आहे याविषयी त्यांनी विवेचन केले.
संतोष नांगरे यांनी माथाडी, अडते, मार्केट कमिटी यांचे साखळी समाजासाठी किती उपयुक्त आहे याची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये विविध राजकीय घडामोडी विषयीही त्यांनी भाष्य केले.
राजकीय वारसा असताना देखील क्रीडा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारी आर्या भागवत तिनेही आपल्या खेळाचा प्रवास उलगडला. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्वल करण्याचा मनोदय व्यक्त केला . एकूण आता रंगतदार वातावरणामध्ये आजचाही ऐश्वर्य कट्टा रंगला.
महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, ३ ऑगस्ट २०२५ :* कधी कुणी नात्यांपासून दूर गेलेलं, तर कुणी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.02ऑगस्ट) : अनेक लोक त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद आणण्यासाठी अनेक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.02 ऑगस्ट :– पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तब्बल ५० शाळांमध्ये मुख्याध्यापक नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक…
महाराष्ट्र 14 न्यूज,पिंपरी, दि. २ ऑगस्ट २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.31 जुलै :- जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्ताने नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन…
महाराष्ट्र 14 न्युज, दि.02ऑगस्ट :- पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, व्यायाम…