Google Ad
Uncategorized

महाराष्ट्र शिरपेचात मानाचा तुरा … केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा मिळाले हे खात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १० जून) : रविवारी झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात नितीन गडकरी यांनी सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने विरोधकांनादेखील प्रभावित केले होते. त्यामुळे च त्यांच्या कडे आता पुन्हा तिच जबाबदारी देण्यात आली आहे.

२०१४ साली मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच नितीन गडकरी यांनी देशभरात कामाचा धडाका लावला होता. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गांचे रुप पालटले व देशात लाखो किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या कामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे ईशान्येकडील राज्यांमधील महामार्गांचे जाळे विस्तारले. दुसरीकडे गडकरी यांच्या प्रयत्नांतून देशातील जलवाहतुकीलादेखील नवीन संजीवनी मिळाली होती. अनेक वर्ष अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया हा १ हजार ३९० किलोमीटर लांबीचा जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला.

Google Ad

शिवाय वाराणसी येथे मल्टीमॉडेल हब स्थापन करुन एक इतिहासच रचला. गंगा नदीच्या स्वच्छतेलादेखील गती आली होती. त्यानंतर गडकरी यांच्याकडे केवळ भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयच ठेवण्यत आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममध्ये गडकरी यांच्याकडे कुठले मंत्रालय येणार याबाबत नागपुरकरांना उत्सुकता होती ती आता पूर्ण झाली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!