Google Ad
Uncategorized

जागतिक योग दिन जिल्हा आयुष रुग्णालयात उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : औंध जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या जिल्हा आयुष रुग्णालयात आज २१ जून हा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ली, डॉ बालाजी लकडे, डॉ विवेक वाणी आणि रुग्णालयातील कर्मचारी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा आयुष रुग्णालयाच्या योग विभागाच्या मुख्य सोनू राऊत यांनी उपस्थिताना योगाचे महत्त्व समजून सांगितले. यावेळी रुग्णालय परिसरात औषधी वनस्पती चे वृक्षारोपण करण्यात आले.

भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. भारताने योगाचा जगभरात प्रचार केला आहे. योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष मान्यता मिळाली आहे. जगभरात योगाचा प्रसार करण्यासाठी आणि लोकांना7 त्याच्या फायद्यांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस (International Yoga Day 2024) साजरा केला जातो.

Google Ad

आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना सर्वप्रथम 27 सप्टेंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली, 21 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी नवी दिल्ली येथे प्राथमिक कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील मान्यवरांसह लाखो नागरिकांनी सार्वजनिकरित्या योगासने केली. योगा दिवसाचे जागतिक महत्त्व सांगून भारताच्या आणि जगभरातील विविध भागात अशाच प्रकारचे उत्सव आयोजित करण्यात आले. तेव्हापासून दरवर्षी 21 जून
आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!