Categories: Uncategorized

स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या भिंतीं बोलू लागल्या

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१९ जानेवारी) : स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या भिंतींना बोलके करण्यात येत आहे. विविध रंगांची पखरण करत अभिनव कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या भिंतींवर अनेक सामाजिक विषय रेखाटले आहेत. त्याचबरोबर ज्यांनी समाजात अष्टपैलू कामगिरी दाखवत स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले अशा आदर्शवत व्यक्तिमत्त्वांना देखील साकारले आहे. यामुळे जनजागृती होण्याबरोबरच स्वच्छतेचा संदेश येथून ये-जा करणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या मनावर कोरला जात आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्वच्छ सुंदर शहर संकल्पनेसाठी निर्देश दिले होते.त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना शहरात राबवली जात आहे.आणि यातून चांगले दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्याचा निर्धार आयुक्त राजेश पाटील यांनी घेतला आहे. याच अंतर्गत शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या अंतर्गत मुख्य म्हणजे स्वच्छतेवर भर देण्यासाठी सर्वप्रथम रस्त्यांच्या लगत असणाऱ्या भिंतींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याचाच परिणाम ‘क’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या अजमेरा, मासुळकर कॉलनी येथे दिसून येत आहे.

यापूर्वी शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या भिंती म्हणजे रंग उडून त्यावर साचलेली धूळ, ठिकठिकाणी साचलेला कचरा असेच काहीसे चित्र शहरात दिसून येत होते. याच रुक्ष भिंतींना बोलके करण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हाती घेतले आहे. साधारण एक किलोमीटर पर्यंत असलेल्या अजमेरा, मासुळकर कॉलनीतील भिंतींवर पर्यावरण जनजागृती, आदर्श व्यक्तिमत्व, विविध खेळ, प्राणी, पक्षी याबद्दल जनजागृती करण्यात आलेली आहे.पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांनी विविध रंगांची पखरण करत हे विषय हाताळले आहेत.अतिशय आखीव-रेखीव असलेली ही चित्रे मासुळकर कॉलनीतील भिंतींना बोलकी करत आहेत.यामध्ये नगरसेवक समीर मासुळकर, राहुल भोसले तसेच नगरसेविका वैशाली घोडेकर, गीता मंचरकर यांनी पाठिंबा दिला. आयुक्त राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे व तसेच आबा ढवळे यांनी पुढाकार घेतला आहे.

*भिंती बनल्या सेल्फी पॉइंट*

अभिनव कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या भिंतींवर महान खेळाडू भारतरत्न सचिन तेंडुलकर , रपद्मविभूषण, पद्मभूषण व ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा, पद्मभूषण व ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे अगदी रेखीव चित्र रेखाटले आहे. याच बरोबर फुटबॉल, हॉकी यांसारख्या खेळांचे चित्र या भिंतींवर आहे. प्लास्टिक पासून पर्यावरणातील सजीवांना होणारी हानी दर्शवण्यात आली आहे. त्याचबरोबर नैसर्गिक अधिवासात पशु पक्षांचे महत्त्व किती आहे. हे देखील या चित्रांमधून दाखवण्यात आले आहे. ही चित्रे पाहण्याबरोबरच येथून ये जा करणारे, तसेच तरुण-तरुनींसाठी या भिंतीं सेल्फी पॉइंट बनला आहे.
—-

*कोणती आहेत चित्रे*

-भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि खेळ जगतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर
-पद्मविभूषण, पद्मभूषण ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा. -पद्मभूषण व ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ.
-देशाच्या सीमेवर देशवासीयांच्या संरक्षणासाठी अहोरात्र झटणारे सैनिक.
-रस्त्यावर घाण करू नका याबाबत जनजागृती करणारी चित्रे.
-खगोलशास्त्र
-प्राणीमात्रांचा नैसर्गिक आदिवास कायम राखण्याबाबत संदेश देणारी चित्रे.
-विविध देशातील सांस्कृतिक जीवन आणि कला.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago