महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०१ ऑगस्ट): – पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरु व्हावी. नागरिक सार्वजनिक वाहतुकीकडे वळावेत. सुलभ आणि सार्वजनिक जलद वाहतुकीतून या शहराचा विकास व्हावा असे स्वप्न लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी पाहिले. पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी (दि. 1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी पाहिलेल्या मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले अशा भावना शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मंगळवारी व्यक्त केल्या. हा क्षण पाहायला, “भाऊ तुम्ही पाहिजे होता”, अशा भावनाही लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा तोंडून येत होत्या.
पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मंगळवारी (दि. 1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जगताप म्हणाले, उद्घाटन झाल्यानंतर दुपारपासूनच पिंपरी-चिंचवड ते सिव्हील कोर्ट आणि डेक्कन जिमखाना ते रुबी हॉल या दुसऱ्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो सेवा सुरु झाली. आता मेट्रोमुळे पुणे रेल्वे स्थानक येथून पिंपरी येथे येण्यासाठी अवघे 22 मिनिट लागणार आहे. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी आणि पहिल्या मार्गातील पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी आणि दुसऱ्या मार्गातील वनाज ते गरवारे कॉलेज या 12.2 किलोमीटर दरम्यान मेट्रो सेवा सुरु आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 ऑगस्ट रोजी दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण केले. लोकार्पण झाल्यानंतर सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. त्यामुळे पुणे ते पिंपरी हे अंतर अवघ्या 22 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. सध्या पुणे मेट्रोच्या सेवेत 18 मेट्रो रेल्वे दाखल झाल्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहर मेट्रो सिटी व्हावे असे स्वप्न लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी दशकापुर्वीच पहिले होते. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला देशाने स्वीकारले. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरानेही भाजपला कौल दिला. याचवेळी लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहर अधिक वेगवान व्हावे यासाठी मेट्रोची संकल्पना मांडली होती. आज लोकनेते लक्ष्मण जगताप यांची संकल्पना प्रत्यक्षात उतरली. याचा शहरातील प्रत्येक नागरिकाला मनस्वी आनंद वाटत असल्याचे शंकर जगताप यांनी सांगितले.
————————-
दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्ग
– फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट (6.91 किलोमीटर)- गरवारे महाविद्यालय ते सिव्हील कोर्ट (2.38 किलोमीटर)- सिव्हील कोर्ट ते रुबी हॉल (2.37 किलोमीटर)
————————
विद्यार्थ्यांना विशेष सवलत
पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात तिकिटांसाठी 30 टक्के सवलत मिळेल. सर्वसामान्य प्रवाशांना शनिवार आणि रविवार या दोन दिवसात तिकिटावर 30 टक्के सवलत मिळेल. तसेच पुढील काही दिवसांत मेट्रो कार्ड कार्यान्वित केले जाणार असून त्यावर 10 टक्के सवलत मिळणार आहे.सर्वसामान्य नागरिकांना सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत शनिवारी आणि रविवारी मिळणार आहे. मेट्रोचे भाडे १० ते ३५ रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहे. दर दहा मिनिटांना मेट्रोची सेवा असणार आहे.
—————————
मेट्रोचे तिकीट दर
■ वनाझ ते रुबी हॉल : ₹ 25
■ पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट : ₹ 30
■ वनाझ ते पिंपरी-चिंचवड : ₹ 35
■ रुबी हॉल ते पिंपरी-चिंचवड : ₹ 30
■ वनाझ ते डेक्कन जिमखाना/संभाजी उद्यान/पीएमसी: ₹ 20
■ वनाझ ते शिवाजीनगर/सिव्हिल कोर्ट/रेल्वे स्टेशन: ₹ 25
■ रुबी हॉल ते शिवाजीनगर: ₹ 15
■ रुबी हॉल ते डेक्कन जिमखाना : ₹ 20
■ पिंपरी-चिंचवड ते पीएमसी/पुणे रेल्वे स्टेशन : ₹ 30
—————————-
विकासाच्या नव्या अध्यायाला आरंभ – शंकर जगताप पिंपरी चिंचवड शहरातून मेट्रो धाववी असे स्वप्न लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्यासह येथील प्रत्येक नागरिकाने पहिले आहे. आज हे स्वप्न साकारले. यातून आपले शहर नक्कीच विकासाच्या नव्या अध्यायाला आरंभ करणार आहे. पुणे मेट्रोने प्रवासासाठी सवलत योजनाही आणली आहे. विद्यार्थ्यांना ३० टक्के सवलत तिकिट दरात देण्यात येणार आहे. पदवीपर्यंतच्या कोणत्याही विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर दुपारी ३ वाजेपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी मेट्रो खुली झाली आहे.
– शंकर जगताप
शहराध्यक्ष
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२२ नोव्हेंबर : चिंचवड विधानसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासनाची थेरगाव येथील शंकर…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ नोव्हेंबर २०२४ : लोकशाहीचा उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावा,…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप - शिवसेना -…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १५ नोव्हेंबर २०२४) पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ नोव्हेंबर २०२४ - चिंचवड विधानसभेत सध्या पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी, नदी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १४:- चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उपलब्ध मतदान यंत्रांच्या प्रथम आणि द्वितीय सरमिसळ…