Categories: Uncategorized

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती मिळू लागली आहे. वर्षभरात पन्नासहून नवीन प्रस्ताव प्राधिकरणाकडे दाखल झाल्याची माहिती एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिली.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी २००५ मध्ये राज्य सरकारने एसआरएची स्थापन केली. या प्राधिकरणामार्फत २००८ मध्ये झोपडपट्टीचे पुनर्वसन प्रकल्पासाठी नियमावली तयार केली. त्यामध्ये झोपडीधारकांना २५ चौरस मीटर क्षेत्रफळाची सदनिका मोफत देण्याची, तसेच त्यासाठी जास्तीत जास्त तीन एफएसआय वापरून बांधकामास परवानगी देण्याची तरतूद होती.

मात्र २०१५ मध्ये त्यात सुधारणा करून एफएसआयमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रकल्पांचे काम ठप्प झाले. दरम्यान, प्राधिकरणाकडून सुधारीत नियमावली तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविली. सरकारने गतवर्षी त्या नियमावलीस अंतिम मान्यता दिली. त्यात अनेक चांगल्या तरतुदी असल्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामाला गती आली आहे. परिणामी ५० प्रस्ताव नव्याने दाखल झाले आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने औंध जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक रक्तदाता दिवस साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५ जून) :रक्तगटाचा शोध लावणारे ऑस्ट्रीयन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टायनर यांच्या जयंतीनिमित्य सन…

18 hours ago

चिंचवड मतदारसंघातील विजेच्या प्रश्नासंदर्भात शंकरभाऊ जगताप यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२३ जून) : चिंचवड मतदारसंघातील विजेच्या प्रश्नासंदर्भात शंकरभाऊ जगताप यांनी महावितरणच्या…

4 days ago

जागतिक योग दिन जिल्हा आयुष रुग्णालयात उत्स्फूर्तपणे साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१ जून) : औंध जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या जिल्हा आयुष रुग्णालयात आज २१…

5 days ago

पिंपरी चिंचवड मनपाच्या सुरक्षारक्षकांनी भाजीविक्रेत्या महिला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ जून) : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील अतिक्रमण कारवाई दरम्यान अतिक्रमण…

1 week ago

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पिंपरी चिंचवड मधील यशस्वी उद्योजक श्री.बबनराव येडे आबांना अमृत महोत्सवी वर्षाच्या दिल्या शुभेच्छा…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जून) : पिंपरी चिंचवड शहरातील  पिंपळे निलख येथील उद्योजक श्री.बबनराव बाबुराव…

1 week ago