Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड शहर रेबीज मुक्त करण्यासाठी … भटकी कुत्री, मांजर यांच्यासाठी या दिवशी मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबिराचे अयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज,दि. २७ सप्टेंबर २०२२ :- पिंपरी चिंचवड शहर रेबीज मुक्त करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आणि शहरातील खाजगी पशुवैद्यक तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने भटकी कुत्री, मांजर यांच्यासाठी मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबिराचे अयोजन करण्यात आले आहे.

जागतिक रेबीज दिनाचे औचित्य साधून, आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२८ सप्टेंबर २०२२ रोजी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत नेहरूनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालय (अॅनिमल शेल्टर) येथे मोफत अँटी रेबीज लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहराला रेबीज मुक्त करण्यासाठी महापालिका क्षेत्रातील प्राणीमित्र, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांचा या मोहिमेत क्रियाशील सहभाग आवश्यक आहे. शहरातील जास्तीत जास्त श्वानांचे आणि मांजरांचे लसीकरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाचे उप आयुक्त सचिन ढोले यांनी केले आहे. तसेच महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथील प्राणी रुग्णालयात दररोज मोफत निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात येत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

8 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

8 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago