महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ जानेवारी) : हळदी कुंकू च्या माध्यमातून राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या अंतर्गत मुळशीच्या शेरे गावातील महिलांचा नवीन उपक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला संस्थेच्या ट्रस्टी पुनमताई मेहता, तसेच प्राचीताई व्यास सुंदरम, सौ.प्रतिभाताई व्यास या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात पुनमताई मेहता यांनी महिलांसाठी असलेला कायद्यांची सर्वाना माहिती दिली. महिलांनी ह्या कायद्यांचा कसा उपयोग करून घ्यावा व कुठल्याही कागदावर सही करताना काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले, सदर कार्यक्रमाचे आयोजन सौ.चित्राताई ढमाले (CRP) उत्तम प्रकारे पार पाडले.
लोक कल्याण व्यसनमुक्ती केंद्रांच्या संचालिका सुजाता प्रताप ओहळे , राष्ट्रीय मानव अधिकार संपर्कप्रमुक महाराष्ट्र राज्य सुवर्णाताई माने यांनी सर्व महिलांना organic सॅनिटरी पॅड ची माहिती दिली, राष्ट्रीय सर्वांगीण ग्रामविकास संस्थेच्या महिला संघटिका स्वातीताई कदम यांनी कार्यक्रमाचे संयोजन, रूपरेषा, सुत्रसंचालन केले.
यावेळी ग्रामपंचायत शेरे माननीय सरपंच संतोष ढमाले, सौ.मनिषाताई संतोष ढमाले, स्नेहा गांधी तसेच बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.