त्यांनी कारवाई करणेबाबत आदेशित केल्याने, पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने व पोलीस अंमलदार जयवंत राऊत, संतोष इंगळे, देवा राऊत, सागर अवसरे यांचे पथकाने पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव येथिल आर्या गॅस सर्व्हिस, सदाशिव कॉलनी, साने चाळ, या दुकानावर छापा मारला असता दोन इसम हे सिलबंद घरगुती गॅस सिलेंडर मधुन स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या कोणतीही खबरदारी न घेता लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल हे माहित असुन सुध्दा मानवी जिवीतास पोहचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासुन सुरक्षित राहण्यास पुरेसा इतका बंदोबस्त करणे गरजेचे असताना ज्वालाग्राही पदार्थाबाबत पुरेसा बंदोबस्त करण्याचे जाणीवपूर्वक टाळुन लोखंडी रिफील पाईप सर्किटच्या सहाय्याने दुसऱ्या रिकाम्या ४ कीलोच्या टाक्यांमध्ये गॅस रिफील पकडण्यात आले.
यामध्ये १) विष्णु ज्योतीराम सुतार वय २४ वर्षे रा. सदाशिव कॉलनी, साने चाळ, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव, पुणे. मुळगाव मु. पो. विजयनगर, हनुमान मंदिरा शेजारी, ता. देवणी जि. लातूर व दुसऱ्या इसमाने त्याचे नाव २) अतुल श्रीहरी पांचाळ वय २५ वर्षे रा. सदाशिव कॉलनी, साने चाळ, पदमजी पेपर मिल जवळ धेरगाव, पुणे. सु. पो. कोहळनुर ता. जळकोट जि. लातूर यांना रंगेहाथ पकडले.
त्यांच्या ताब्यातुन ७८,७००/- रु किं चा एकुण मुद्देमाल त्यामध्ये २१ घरगुती वापराचे गॅस भरलेले विविध कंपनीचे सिलेंडर, ०१ घरगुती वापराचे रिकामे सिलेंडर, ०३ घरगुती वापराचे अर्धा गॅस काढलेली टाकी, ०१ व्यावसायीक वापराचे रिकामे सिलेंडर, ०५ लहान सिलेंडर, ०१ लहान पितळी रिफिलर, ०३ लोखंडी रिफील पाईप, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, गॅस रीफिलिंग करीता वापरात येणारे एक गॅस रिफिलिंग सर्किट त्यास रबरी पाईप असलेले व दोन्ही बाजुस सिलेंडरला बसणारे पितळी व स्टिलचे कॉक व त्याचेवर लाल रंगाचे फिरवण्याचे बटण, ०२ लोखंडी अॅडजेस्टेबल पान्हे असे साहित्यसह मिळुन आले.
तसचे दुसऱ्या ठीकाणी सदाशिव कॉलनी, पदमजी पेपर मिल जवळ थेरगाव, पुणे या ठिकाणी याचप्रकारे एका रुममध्ये अवैधरित्या पाईप सर्किटचे सहाय्याने कोणतीही खबरदारी न घेता रिकाम्या ४ किलोच्या छोटया गॅस टाक्यांमध्ये बेकायदेशिरपणे गॅस रिफील करीत असल्याची माहिती मिळाल्याने तेथे छापा टाकुन इसम नामे जयराम सर्जेराव चौधरी वय २२ वर्षे रा. देवा मेटकरी यांची रूम लमाण तांडा नेहे दत्तवाडी ता. मुळशी जि. पुणे. मुळगाव- मु. कुंभारी, पो. वाघी बोबडे ता. जिंतुर जि. परभणी यास ताब्यात घेवून त्याच्या त्याच्यातुन ७१,५२५/- रु किं चा एकुण मुद्देमाल त्यामध्ये ९ घरगुती वापराचे गॅस भरलेले असलेले सिलेंडर, ११ घरगुती वापराचे रिकामे विविध कंपनीचे सिलेंडर, विविध कंपनीचे ०२ व्यावसायीक वापराचे रिकामे सिलेंडर, ११ भरलेले लहान सिलेंडर, १० रीकामे लहान सिलेंडर, ०२ पितळी रीफीलर नोजल, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा, ०१ लोखंडी अॅडजेस्टेबल पान्हा असे साहित्य जप्त करण्यात आले. सदरचे प्रकारे मानवी वस्त्यांमध्ये सुरु होते.
सदर दोन्ही कारवाई मध्ये एकुण १,५०,२२५/- रुपये कींमतीचा मुद्देमाल त्यामध्ये एकुण ४३ घरगुती वापराचे विविध कंपनीचे सिलेंडर, ०३ व्यवसायिक वापराचे सिलेंडर, २६ छोटे ०४ कीलोचे सिलेंडर असे एकुण ७२ विविध कंपनीचे गॅस सिलेंडर जप्त करुन ०३ आरोपी विरुध्द वाकड पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम २८५, २८६ सह जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३, ७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ अन्यये ०२ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०६ जानेवारी : महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे मुले-मुली शिक्षण,कला,संशोधन,क्रीडा यासारख्या विविध क्षेत्रात…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०४ जानेवारी : पिंपळे गुरव परिसरात सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व जनसामान्यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.०३ जानेवारी : पुणे येथील औंध जिल्हा रुग्णालय येथे आयोजित दौऱ्यात महाराष्ट्राचे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिं.चिं. शहर यांच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२७ डिसेंबर : पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे शहर असून, येथील…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…